“पंतप्रधान कुसुम योजने” च्या बनावट वेबसाईटवरून शेतकऱ्यांनी फसवणूक; ‘या’ वेबसाईट पासून दिला सावध राहण्याचा इशारा…
पंतप्रधान कुसुम सोलर पंप (PM Kusum Solar Pump) या योजनेमागचा मुख्य उद्दिष्टय हा आहे कि, कमीत कमी किमतीमध्ये सौर कृषी पंप (Solar agricultural pump) उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे. कुसुम सोलर पंप (Kusum Solar Pump) ही योजना माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडून लॉन्च केलेली आहे. ही योजना केंद्र सरकारची योजना (Central Government’s plan) आहे. शेतकऱ्यांसाठी (For farmers) काढण्यात आलेल्या योजनेचा नवीन वेबसाईट काढून गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे.
खोट्या वेबसाईट काढून बळीराजाची फसवणूक होताना पाहायला मिळत आहे. १४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून पंतप्रधान कृषी योजनेचे (Prime Minister’s Agriculture Plan) अर्ज स्वीकारले जात आहेत. या योज़नेच्या संदर्भांत बऱ्याच खोट्या, फसव्या वेबसाईटस (Fraudulent websites) बनवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर सावधान राहण्याचा इशारा मंत्रालयाने (By the Ministry) दिला आहे.
हे हि वाचा
- सरकार आधारकार्ड प्रमाणे बनवणार “डिजिटल युनिक हेल्थ कार्ड”; जाणून घ्या हे कार्ड तुमच्या आरोग्यासाठी किती महत्वाचे…
बनावट वेबसाईटवर शेतकऱ्याची फसवणूक –
पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप (Solar pumps from farmers) अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे.
बनावट वेबसाइट –
त्यापैकी काही बनावट वेबसाइट्स * .org, * .in, * .com अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana . com
पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी (For the PM-Kusum scheme) अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या (Of the state government) विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना (Pradhan Mantri-Kusum Yojana) राबविली जात आहे. योजनेच्या अधिक तपशीलांसाठी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (MNRE) www.mnre.gov.in किंवा 1800-180-3333 टोल फ्री नंबर डायल करा. अशी सूचना देण्यात आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा