आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) मानवी जीवनासाठी जितके सोईस्कर आहे, त्याचप्रमाणे ते घातक देखील आहे. सोशल मीडियावर (On social media) बरेच व्हायरल मेसेज होत असतात नागरिकही अशा वायरल मेसेज ची खातरजमा न करता पुढे मित्रांना व नातेवाईकांना फाॅरवर्ड (Forward) करत असतात. त्याचा कधी कधी इतका गंभीर परिणाम होतो हे आपल्याला कळत देखील नाही.
हे ही वाचा : जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…
शिक्षक भरतीसाठी (For teacher recruitment) बऱ्याच जणांनी सरकारी वेबसाईट म्हणून अर्ज केला परंतु ती वेबसाईट खोटी असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले तरी वेळीच सावध राहणं गरजेचं आहे. कारण, shikshaaabhiyan.org या वेबसाईटवरुन तुम्ही शिक्षक किंवा इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज केला असेल, ही वेबसाईट खोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात मुंबईतील मरिन लाईन्स पोलिस स्थानकात (Marine Lines Police Station) राज्य शासनानं (State Government) तक्रारही दाखल केलीय. (shikshaaabhiyan-website-is-fake-clarifies-maharashtra-government-case-filed-in-marine-lines-police-station) पुढे शिक्षण मंडळाने या वेबसाईट चा राज्य शासनाचा कोणताही संबंध नाही असे नमूद केले, अश्या फसव्या वेबसाईट पासून नागरिकांनी सावधान राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : गंधकाच्या कमतरतेची मुळे आढळून येणारी लक्षणे तसेच वाचा गंधकाचे कार्य व महत्व…
अश्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये, यामुळे भविष्यात संभाव्य धोका निर्माण होवू शकतो. ज्या प्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान वाढ होत आहे त्याच प्रमाणे सायबर गुन्हेगारी(Cybercrime) देखील वाढत चालली आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
1)चक्रीवादळमुळे नुकसान झाले असल्यास ‘हे’ काम करा!
2)टोमॅटोच्या पिकांपासून उद्योगातील मोठी संधी! पहा याकरता कोणती उपकरणे लागतात…