कृषी सल्ला

“या” कारणामुळे ग्रामस्थांनी सरपंचांच्या खुर्चीवर बसवला कुत्रा; काय आहे भानगड? सविस्तर पहाच..

महिला सरपंच अंबाजोगाई लगतच्या मोरेवाडी येथील राहणाऱ्या मागील दोन वर्षापासून गैरहजर असल्याचा आरोप करत काही ग्रामस्थांनी सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवून निषेध व्यक्त केला. काय आहे घटना? या घटनेविषयी सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

या घटनेची सर्वत्र चर्चा –

सरपंचाला ग्राम पंचायतमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सरपंचाच्या गैरहजर राहण्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि.१२) ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयात सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवले. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

वाचा –

ग्रामस्थांनी दिले मागण्यांचे निवेदन –

मोरेवाडी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद आहे की, येथील सरपंच मागील काही वर्षापासून फक्त झेंडावंदन व सार्वजनिक उत्सवासाठीच ग्राम पंचायत कार्यालयात येतात. इतर सर्व कामकाज त्या घरात बसूनच करत आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा विनंती करूनही त्या कार्यालयात येत नाहीत. सरपंचांनी मासिक सभा आणि ग्रामसभा देखील घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना ग्राम पंच्यात कार्यालयात हजर राहण्यास कायदेशीर सांगण्यात यावे अन्यथा वेगवेगळ्या आंदोलनाचा आणि ग्राम पंचायतचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

पीएम किसान योजनेच्या समस्या सोडवण्यात अधिकारी असमर्थ; अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button