कृषी बातम्या

Fruit Crop | या 8 फळपिकांसाठी राज्यसरकारकडून 17 कोटीहुन रुपये विमा कंपनीकडे जारी, फळपीक शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

Fruit Crop | फळपीक बागायतदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारने फळपीक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. फळपिकांसाठी (Fruit crop) 17 कोटीचा हप्ता भरण्यासाठी राज्यातील विमा कंपन्यांना मान्यता दिली आहे. याचा फायदा भरपूर शेतकऱ्यांना होणार आहे.

फळपीक बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. 2021- ते 2024 या 3 वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, डाळिंब, सीताफळ, लिंबू आणि द्राक्ष या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये योजना राबविली जात असल्याची माहिती समोर आली आहे. हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

वाचा – कापसाचे दर 10 हजार 551 रुपयांवर पोहचले, एप्रिल महिन्यात कापूस 13 हजारांवर जाण्याची शक्यता

17 कोटी 70 लाख रुपयांचा हप्ता विमा कंपनीकडे जारी –

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, तसेच पीक नुकसानीचे भरपाई मिळावी यासाठी एचडीएफसी अर्गे जनरल इंन्शुरन्स, रिलायन्स जनरल इंन्शुरन्स आणि भारतीय कृषी विमा कंपन्यांमार्फत फळपिक (Fruit crop) विमा योजना राज्यामध्ये राबवली जाते. 17 कोटी 70 लाख रुपयांचा हप्ताच राज्य सरकारने विमा कंपनीकडे जारी केला असल्याची माहिती आहे. आता वेगवेगळ्या फळपिकांना विमा मिळण्याचा मार्ग शेतकऱ्यांना सहज मिळाला आहे.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button