योजना

Food Security Schemes | राज्य अन्न आयोगाचा महत्त्वपूर्ण सल्ला; अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य खरेदी थेट शेतकऱ्यांकडून, जाणून घ्या सविस्तर ..

Food Security Schemes | Important advice of State Food Commission; Purchase of grain directly from farmers under food security scheme, know in detail..

Food Security Schemes | राज्य अन्न आयोगाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत होणारी धान्य खरेदी थेट शेतकऱ्यांकडून किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.(Food Security Schemes) यामुळे दलाली आणि वाहतुकीचा खर्च वाचून शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.

आयोगाने राज्य सरकारला दिलेल्या दिशानिर्देशांनुसार, आता अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य त्याच जिल्ह्यात वितरित केले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच धान्य विकण्याची संधी मिळेल.

याचिकाकर्त्यांची मागणी होती की, अन्न सुरक्षा योजनेचे अन्नधान्य संकलन आणि वितरणात शेतकऱ्यांचा समावेश केला जावा. यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल.

आयोगाने या मागणीला मान्यता देत राज्य सरकारला दिशानिर्देश दिले आहेत. या सल्ला मुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनाही फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

वाचा : Lunar Eclipse | आज रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, आज रात्री चंद्र बदलेल रंग! पाहायला चुकू नका हे दुर्मिळ चित्र..

इतर महत्त्वाचे निरीक्षणे आणि सल्ला

आयोगाने राज्य सरकारला खालील महत्त्वाचे निरीक्षणे आणि सल्ला दिले आहेत:

  • अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. यामुळे त्यांना ‘मग्रारोहयो’मध्ये समाविष्ट करावे.
  • महिला बचत गट शालेय पोषण आहार तसेच कामगार कल्याण विभागामार्फत कामगारासाठी शिजवला जाणारा आहार, यासाठी धान्य बाजारातून खरेदी करतात. या खरेदीसाठी महिला बचत गटांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून धान्य खरेदी करावे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Web Title : Food Security Schemes | Important advice of State Food Commission; Purchase of grain directly from farmers under food security scheme, know in detail..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button