यशोगाथा

उसामध्ये फ्लॉवर्सचे आंतरपीक असे फुलवा; कमी खर्चात जास्त उत्पादन, पहा सविस्तर..

Flower intercropping in Usa; High production at low cost, see details ..

शेतकरी (Farmers) आपल्या शेतात स्वतःच्या कल्पनेने शेती करत असतो. नवनवीन आयडिया ने पिके घेत असतो. ज्या पद्धतीने जास्त नफा मिळेल ती पद्धत वापरून पाहत असतो. नफा, तोटा मिळाला तरी पिके घेयची थांबवत नाही. अशाच ऐका बोरी खुर्द येथील शरद हाडवळे या शेतकऱ्याने उसामध्ये फ्लॉवरचे पीक घेऊन पहिल्याच तोड्यामध्ये 4 टन उत्पादन काढले आहे.

शेतकरी नेहमी नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतो तसाच हाडवळे यांनी त्यांच्या ऊस फ्लॉवर (Sugarcane flower) ची शेती केली. म्हणजेच उसामध्ये फ्लॉवर ची शेती केली. यामध्ये त्यांना भरघोस उत्पन्न (income) मिळाले. उसामध्ये फ्लॉवर चे आंतरपीक करण्यासाठी त्यांनी सव्वा एकर क्षेत्राची निवड करून खत, मळी टाकून घेतली.

१५२२ या जातीची पंधरा हजार रोपे नारायणगाव येथील नर्सरीमधून आणून एक फुटाच्या अंतरावर लावून लागवड केली. लागवड (Planting) झाल्यानंतर या पिकाला ठिबक सिंचनने पाणी देऊन फक्त एकदाच औषधे फवारणी केली यामध्ये विशेष करून जैविक खतांचा वापर करण्यात आला. ४५ दिवसांनी या फ्लॉवरची काढणी (Flower Harvesting) सुरू झाली व त्यात आजपर्यंत जवळपास ४ टन माल निघाला आहे.

वाचा : ‘या’ फुलांची शेती करा आणि बक्कळ पैसे कमवा…

वाचा : शेवंती लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर..

बाजारपेठेत फ्लॉवरचे १० किलोला १०० रुपये बाजारभाव असून चार टनाचे ४० हजार झाले आहेत व आतापर्यंत ३२ हजार रुपये खर्च झाला. पहिल्याच तोड्यात खर्च जाऊन आठ हजार रुपये शिल्लक राहिले. नंतर सात ते आठ टन माल निघेल. शरद हाडवळे यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न काढले. आपल्या शेतात रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर न करता सेंद्रिय खतांचा (Organic fertilizers) वापरावर त्यांनी भर दिला. चांगल्या फ्लॉवर्समुळे इतरांपेक्षा त्यांना चांगला बाजारभाव मिळाला. सध्या सुरू असलेल्या बाजारभावानुसार सत्तर ते ऐशी हजार रूपये नफा मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button