गेल्या आठवड्यात सलगच्या सुट्ट्या कृषी उत्पन्न बाजार समितीला होत्या आणि त्यातच कोरोनामुळे लॉकडाउन होते की काय या भीतीपोटी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुणे, सोलापूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची जास्त प्रमाणात आवक दिसत दिसू लागली. कोरोनाचे संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठया परिणाम करत असल्याचा जाणवत आहे. तरीदेखील कांद्याचे दर स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
कांदा नाशवंत माल असल्याकारणाने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन झाल्यास कांदा खराब होऊन जाईल व नुकसानीला सामोरे जावे लागेल या भीतीमुळे शेतकरी कांदा काढणीनंतर कांद्याची लगेच बाजारपेठेत विक्री करत आहेत व कदाचित ही आवक आठवडाभर अशीच राहील असे जाणकारांचे मत आहे.
सध्या कांद्याचा बाजार भाव प्रति क्विंटल 500 रुपये ते 1400 रुपये पर्यंत इतका दर मिळत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.