जाणून घ्या, सातबारा वर कधी दिसणार इ-पिक पाहणीच्या नोंदी? नसेल माहीत तर वाचा सविस्तर..
Find out, when will e-pick survey records appear on Satbara? If you don't know, read the details.
महसूल विभागाच्या माध्यमातून अतिशय नाविन्यपूर्ण शेतकर्यासाठी अतिशय उपयोगाचा असा हा प्रकल्प याठिकाणी सुरु केलेला आहे तो म्हणजे इ-पिक (e-peek) पाहणी कारण शेतकर्याला स्वताच्या सातबार्यावरती स्वताची जी पिकाची नोंद आहे ती अगदी अचूकरित्या करण्यासाठी हा एक पर्याय उपलब्ध केलेला आहे यामधून शासनाला (government) एक अचूक डेटा पण मिळणार आहे.
इ-पिक वर केलेल्या नोंदी सातबाऱ्यावरती कधी दिसणार?
१५ सप्टेंबर पासून ३० सप्टेंबर पर्यंत तलाठी लॉग इन च्या माध्यमातून तसेच तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून याची अचूकता पडताळणी केली जाणार आहे. ज्याच्यामध्ये जो खातेधारक (account holder) कोण आहे? त्याचा मोबाईल नबर काय आहे? तो खाते धारक खरा आहे का? त्यानेच केलेली नोंद आहे का? हि अचूक तपासणी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून केली जाणार आहे.नोंदी तपासत असताना काही चुकीच्या नोंदी दिसल्यास रद्द केल्या जातील व दुरुस्त करण्यास भाग पाडले जाईल.
जर यामध्ये चूक सापडली नाही तर त्या नोंदी त्या ठिकाणी स्वीकारल्या जातील. जे १ ऑक्टोबर २०२१ पासून शेतकर्याच्या (farmer) खरीब २०२१ च्या पिकामध्ये दाखवल्या जातील. यानंतर १ ऑक्टोंबर २०२१ च्या आपल्या रब्बीच्या नोंदी पिक पाहणीच्या माध्यमातून आपल्याला याठिकाणी उपलोड करता येणार आहेत.
वाचा : शेतकरी कंपन्यांसाठी 200 क्रॉपशॉपची उभारणी करणार -सहकारी महामंडळाचा निर्णय
वाचा : महाराष्ट्र राज्यात प्रथमच केबल शेडला मिळणार तीन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान -कृषी आयुक्त
सामायिक क्षेत्रामध्ये नोंदी कशा करायच्या ?
सामायिक क्षेत्रामध्ये ज्या शेतकर्यांच जेवढ क्षेत्र असेल स्वताच्या वाटणीचं जे क्षेत्र आहे,सातबाऱ्यावरती जेवढी त्याच्या नावावर नोंद असेल किवा त्याचा हिस्सा जेवढा असेल तेवढ्या हिस्य्याच्या क्षेत्रावरती तो प्रत्येक खातेधार आपल्या पिकाची नोंद करू शकतो. त्यासाठी प्रत्येक सामायिक खातेदार याठिकाणी लॉग इन करू शकतात आणि स्वतःच्या क्षेत्राचा पिक पेरा लावू शकतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :