बेदाणे निर्मितीचा (Bedane) हंगाम अंतिम टप्प्यात आहे दरवर्षी बेदाणे निर्मितीच्या काळात अवकाळी पावसाचा फटका बसतो. कधीही वातावरणात बदल होतो, त्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार होत नाही परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते परंतू या वर्षी बेदाणे निर्मिती पोषक वातावरण आहे त्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झाला आहे.
यावर्षी बेदाण्याचे दर दिवाळीपासून टिकून आहेत तसेच यावर्षी बेदाणे चांगले भाव देखील मिळत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळत आहे. यावर्षी राज्यात एक 70 लाख टन बेदाण्याची उत्पन्न होण्याचा अंदाज आहे तीस हजार टनांहून अधिक बेदाण्याची विक्री गतवर्षी झालेली आहे मागील वर्षीपेक्षा या वर्षी 25 ते 35 रुपयांपर्यंत बेदाण्याच्या दरात (Rate) वाढ झाली असल्यामुळे बेदाण्याचे दर आला गोडी राहिली आहे असे काही जाणकारांनी मत व्यक्त केले.
राज्यात सांगली, सोलापूर, नाशिक जिल्ह्यासह कर्नाटकामधील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.मागील वर्षी कोरोनचा प्रादुर्भाव( Covid-19) झाल्यामुळे द्राक्ष हंगाम संकट आले होते. परिणामी वाहतूक थांबली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाने निर्मितीला पसंत दिल्यामुळे दोन लाख दहा हजार टन इतके वेदनेची उत्पन्न झाले आहे यावर्षी वेदनेला चांगला दरही मिळत आहे त्यामुळे ‘शेतकरी राजा ‘ ( Farmers) थोडा का होईना सुखावला आहे.
सध्या बाजारामध्ये प्रति किलोस दीडशे ते दोनशे चाळीस असा दर ( Rate) मिळत आहे हा दर टिकून राहील असे व्यापारी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.