ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Sugarcane Rate | शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्गावरील चक्काजाम आंदोलन मागे! अखेर ऊस दराची फुटली कोंडी; ‘इतक्या’ रुपयांवर निघाला तोडगा

The protest of farmers on the national highway is back! Finally, the sugarcane price dilemma broke; The settlement was settled at Rs

Sugarcane Rate | माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता किमान शंभर रुपये मिळण्यासाठी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन आज मागे घेण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

उसाला हप्ता १०० रुपये
जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत मागील हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता १०० रुपये आणि पुढील हंगामातील ऊसाला पहिला हप्ता १०० रुपये याप्रमाणे देण्याचे मान्य करण्यात आले. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, विनोद पाटील, संजय पाटील, आप्पासाहेब जाधव, जिल्हाधिकारी दत्तात्रेय गावडे, सहकार आयुक्त प्रशांत नारनवरे, साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वाचा : Sugarcane |अखेर समजल हा! ऊसाला तुरा येण्याची कारणे व उपाय योजना; जाणून घ्या सविस्तर बातमी…

या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता १०० रुपये मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणी मान्य केली.

शेतकऱ्यांच्या मागणीला यश
या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागणीला यश आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. पुढील हंगामातील ऊसाला पहिला हप्ता १०० रुपये मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. या आंदोलनामुळे राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही ऊस दरवाढीची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Web Title: The protest of farmers on the national highway is back! Finally, the sugarcane price dilemma broke; The settlement was settled at Rs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button