lang="en-US"> राज्यातील 'या' पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्के अनुदान ! सरकारने घेतला मोठा निर्णय - मी E-शेतकरी

राज्यातील ‘या’ पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५० टक्के अनुदान ! सरकारने घेतला मोठा निर्णय

भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. काही वर्षांपूर्वी शेतकरी अगदी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकरी शेतीत विविध प्रयोग करत आहेत. तसेच पारंपरिक पिके सोडून इतर पिकांचे देखील उत्पादन घेत आहेत.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान

दरम्यान सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना व अनुदाने जाहीर करते. सध्या बिहार सरकारने (Bihar Government) राज्यातील केळीउत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार

बिहारमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी लागवड (Banana Farming) करतात. मात्र शेतकऱ्यांना यासाठी मोठे भांडवल खर्व करावे लागते. दरम्यान या शेतकऱ्यांच्या खिशावरील भार कमी करण्यासाठी बिहार सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ५० टक्के अनुदान जाहीर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशावरील भार हलका होणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत बिहार राज्यसरकार शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंतचे अनुदान देणार आहे. टिश्यू कल्चर पद्धतीने केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत करण्यात येणार आहे. बिहार सरकारच्या (Bihar Government) फलोत्पादन संचालनालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

कमी वेळात अनेक केळीची झाडे तयार होणार

‘टिशू कल्चर’ ( Tissue Culture) म्हणजे एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे . ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात किंवा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असे सुद्धा म्हणतात. यामध्ये कमी वेळात अनेक केळीची झाडे तयार केली जातात. महत्त्वाची बाब म्हणजे ही झाडे अधिक निरोगी असतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Fifty percent subcidy on banana farming

Exit mobile version