ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

FIFO | सातबारा फेरफारासाठी राज्यात ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजना; तलाठी, तहसीलदारांना आदेशामुळे शेतकऱ्यांची कामे ‘इतक्या’च दिवसांत होणार

FIFO | महाराष्ट्र सरकारने सातबारा फेरफार प्रकरणांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (फिफो) योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. यामुळे सातबारा फेरफार, गाव नमुना, दुरुस्ती, पोटहिस्सा अशी कामे वेळेत मार्गी लागण्यास मदत होईल. यापूर्वी तलाठी आणि मंडल अधिकारी स्तरावर फिफो यंत्रणा लागू करण्यात आली होती. त्यामुळे सातबारा उतारा किंवा फेरफार उताऱ्यावर नोंदी घेण्याचा कालावधी कमी होऊन ३० दिवसांवर आला होता. पूर्वी याच कामांसाठी किमान ४० ते ४५ दिवसांचा कालावधी लागत होता.

तहसीलदार पातळीवरही फिफो योजना लागू केल्याने या कामांमध्ये आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच, दिरंगाई आणि गैरव्यवहाराला आळा बसण्यास मदत होईल. सातबारा फेरफार प्रकरणांमध्ये अनेकदा दिरंगाई होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरी, गावकरी यांना वेळेत न्याय मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

वाचा : Drip Irrigation | मोठा निर्णय! शेतकऱ्यांना सात नाहीतर तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ; धोरणातील मोठ्या बदलामुळे ‘इतके’ मिळणार अनुदान

फिफो योजना लागू केल्याने शेतकऱ्यांना, गावकरी यांना दिलासा मिळेल. त्यांच्या कामांमध्ये वेळेची बचत होईल. राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा असून, यामुळे महसूल प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

  • फिफो योजनेचे फायदे
  • सातबारा फेरफार, गाव नमुना, दुरुस्ती, पोटहिस्सा अशी कामे वेळेत मार्गी लागतील.
  • दिरंगाई आणि गैरव्यवहाराला आळा बसेल.
  • शेतकऱ्यांना, गावकरी यांना दिलासा मिळेल.
  • महसूल प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल.

Web Title: ‘First come first served’ scheme in the state for seven-twelfth reform; Due to the order to Talathi, Tehsildar, the work of the farmers will be done in ‘so many’ days

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button