Father’s Day special : वडील एक दैवी देणगी! चला तर आपण पाहूयात प्रसिद्ध पिता पुत्रांची जोडी..
Father's Day special: Father is a divine gift! Let's see the famous father and son pair ..
‘मातृत्वाचा’ अनुभव जगात जरी श्रेष्ठ असला, तरी ‘पितृत्वाची’ शाळा आपणास जगायला शिकवते. प्रत्येकासाठी वडिलांची व्याख्या वेगळी असते, कोणासाठी अण्णा, कोणासाठी आप्पा, कोण कोणासाठी बाबा, तर कोणासाठी पप्पा वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला तरी भावना मात्र एकच असते.
कठोर हृदयातून मुलांसाठी पाझर फुटत असतो तो बापाचा. कितीही मोठं संकट आले तरी निधडया छातीवर पेलाण्याची शक्ती नैसर्गिक देणगी असत यांच्यामध्ये. आई जरी जन्म देऊन जग दाखवत असती तरी जगात वावरण्यासाठी वडील रात्रीचा दिवस करत असतात.
कितीही गरीब बाप असुदे, पण आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी तू सदैव तत्पर व मनाची श्रीमंती जपत असतो. येणाऱ्या परिस्थितीशी लढता लढता तो मात्र स्वतः जगायच विसरून जातो.पहिली मुलगी झाल्यावर जेवढा आनंद आईला होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आनंद बापाला होतो, आई वडिल होणं सोपे असेल कदाचित पण पालक होऊन मुलांचे व्यवस्थित संगोपन करण्याकरिता संपूर्ण जीवन पनाला लागतं. आई वडिलांची किंमत त्याला अधिक कळते, जबाबदारीचा डोंगर आपल्या माथ्यावर येऊन बसतो. आई-वडिलांवर बोलावे तेवढे थोडेच आहे हे नातं शब्दात कधीच व्यक्त करता येत नाही.
Father’s day संकल्पना प्रथम 1972 रोजी अमेरिका व इंग्लंड (England) मध्ये सादर करण्यात आला. जून महिन्यात अनेक वातावरणात बदल घडत असतात, या पावसाला देखील सुरुवात होते, तसेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये वर्षभरातील सर्वात मोठा दिवस या दिवशी असतो, म्हणून Father’s day नेहमी जूनच्या तिसऱ्या आठवड्यातील रविवारी साजरा केला जातो. चला तर मग, आपण काही प्रसिद्ध पिता पुत्रांची जोडी पाहूयात..
-दिपाली सुरेश फडतरे
1) अल्लू अर्जून व अऱ्हा अर्जुन (Allu Arjun and Arha Arjun)
2) शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Sharad Pawar and Supriya Sule)
3) मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी(Mukesh Ambani and Akash Ambani)
4) अभिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhitab and Abhishek Bacchan)