कृषी सल्ला

ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी चिंतेत; सातबारा ऑनलाइन प्रक्रियेच्या मुदतवाढसाठी मागणी..

इ-पीक (E-Crop) पाहणीच्या ऑनलाईन (online) प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सरकारने सन 2021-22 करिता ई-पीक पाहणी ऑनलाईन ॲपद्वारे आणल्यामुळे, काही शेतकऱ्यांना अगदी सोप्पी तर शेतकऱ्यांना बऱ्याच ऑनलाईन प्रोसेसमुळे कठीण झाले आहे.

वाचा –

इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे –

नेटवर्क समस्या (Network problem), जिओ ट्रॅकिंग समस्या (jio tracking problem) तर कधी छायाचित्र काढत असतानाची समस्या, अशा विविध समस्यांमुळे शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी (E-Crop Survey) वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. तसेच मुदत संपत असल्याने शेतकरी आणखी चिंतेत आला आहे.

वाचा –

सरकारने (government) ई-पीक पाहणी (E-Crop Survey) नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली, तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांना आपला धान केंद्रावर विकण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया (Online process) सुरू केली आणि त्याची शेवटची तारीखही 30 सप्टेंबर दिली आहे. एवढ्या कमी वेळेत शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी (E-Crop Survey) अपलोड करून, सातबारा हातात घेऊन धान खरेदी केंद्रावर (grain shopping center) सातबारा पोहोच करणे शक्य होणं कठीण आहे. सातबारा मिळण्यासाठी 2-3 दिवस तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात व त्यानंतर 7/12 हातात मिळतो.

मुदतवाढसाठी मागणी –

धान खरेदी केंद्रावर (grain Shopping center) नंबर लावण्याकरिता पुन्हा रांगेत उभे राहावे लागते. काही ठिकाणी शेतकऱ्यांना (farmers) दिवसभर उभे राहून आपला नंबर लावावा लागतो, तरीही सर्व प्रक्रिया 30 सप्टेंबरच्या पूर्वी होईल का, या विचाराने सर्व शेतकरी (Farmers) चिंतेत पडले आहेत. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या लक्षात घेता, धान खरेदी केंद्रावर सातबारा ऑनलाइन (7/12 online) करण्याच्या प्रक्रियेत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भारतीय जनता युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विलास बागडकर यांनी केली आहे.

वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button