योजना

केंद्र सरकारच्या “या” योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये; कोणती आहे योजना? व लाभ कसा घेता येईल? पहा सविस्तर..

केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांसाठी पीएम किसान पीएफओ (Prime Minister Farmer PFO) योजना आणलेली आहे. शेती सोबत शेतकऱ्यांना (farmers) शेती (Agriculture) संबंधित असलेले व्यवसाय सुध्दा करता येतील व या व्यवसायांना चालना मिळेल या हेतून पीएम किसान पीएफओ योजनेला सुरुवात केली आहे. या योजनेसाठी सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपयापर्यंतची मदत करणार आहे. या योजनेसाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तर या योजनेचा कसा लाभ घेता येईल? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

वाचा

मदत कशी घ्याल ?

कृषी संबंधित उपकरणे (Agricultural related equipment) खते, किटकनाशके, बियाणे इत्यादी वस्तूंची खरेदी करण्यास मदत करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना व्यवसाय (Business farmers) सुरू करण्यासाठी 11 शेतकऱ्यांचा गट किंवा संघटना बनवावी लागेल. या संघटनेला किंवा गटाला सरकारकडून मदत घेता येईल.

वाचा –

6,885 कोटींची तरतूद –

शेतकऱ्यांसाठी (farmers) सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना फायदा मिळेल. अशीच ही योजना लवकरच राबविली जाणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. शेतकर्यांना कोणत्याही दलाल किंवा सावकाराकडे जाण्याची गरज भासणार नाही. किंवा कोणाकडून उधारी घेण्याची गरज पडणार नाही. हा हेतू केंद्र सरकारचा आहे. या योजेनेअंतर्गत शेतकर्यांना तीन वर्षांत हफ्त्यांद्वारे पैसे दिले जातील. सरकारकडून २०२४ पर्यंत ६,८८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. अशी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button