Onion Subsidy | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मिळणार 350 रुपये अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Onion Subsidy | सध्या राज्यातील कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान (Agricultural Subsidy) देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता कोणत्या कांदा उत्पादक (Onion Subsidy) शेतकऱ्यांना
अनुदान मिळणार आहे, तसेच कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी कांदा अनुदानासाठी (Onion Subsidy) अर्ज करू शकतात याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कांदा उत्पादकांसाठी महत्वपूर्ण निर्णय
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कांद्यासाठी अनुदान (Onion Subsidy) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Agriculture Scheme) 200 रुपये प्रतिक्विंटलच्या मर्यादेपर्यंत कांद्यासाठी हे अनुदान मिळणार आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?
ज्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांत खाजगी बाजारात थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे किंवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या काळात कांद्याची (Onion Subsidy) विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान 200 रुपयांच्या मर्यादेत मिळणार आहे.
वाचा: बाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?
किती तारखेपर्यंत कराल अर्ज?
कांद्याच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे 350 रुपयांची अनुदान मिळण्यासाठी 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे
- विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी
- कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा
- बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स
- आधार कार्डची झेरॉक्स
हेही वाचा:
- सरकारी पेन्शनर्सना नो टेन्शन; हयात असल्याचा पुरावा आता द्या घरी बसून…
- चर्चा तर होणारचं ना राव! चक्क 1 कोटींच्या बंगल्यात राहते ‘ही’ गाय अन् खाते तुपातले लाडू, जाणून घ्या खासियत
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
Web Title: Onion farmers will get subsidy
of Rs 350 per quintal, appeal to apply by date