ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

गायीच्या शेणापासून शेतकऱ्याला मिळणार वर्षाला ५५,००० रुपयांचा आर्थिक फायदा.. केंद्र सरकार खरेदी करणार…

गायीच्या शेणापासून शेतकऱ्याला मिळणार वर्षाला ५५ हजार रुपयांचा आर्थिक फायदा .. केंद्र सरकार खरेदी करणार गायीचे शेण…जाणून घ्या सविस्तर

गायीला कामधेनू म्हणलं जात. गायीचे दूध गोमूत्र तसेच शेणपासून इतर अनेक पदार्थ बनवले जातात. व त्यांचा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी उपयोग केला जातो .गायीच्या गोमूत्राला ही आयुर्वेदिक महत्व आहे. गायीचे दूध हे शरीराला खूप पौष्टिक तर असतेस तसेच आयुर्वेदानुसार आरोग्यदायी ही असते.

गायीच्या शेणापासून प्रदूषण नियंत्रण करता येते हे माहितच आहे, याच मुद्द्याला धरून गायीच्या शेणापासून पेंट तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे वाढलेले प्रदूषण नियंत्रण होण्यास मदत मिळेल. केंद्र सरकार गायीच्या शेणापासून पेंट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून गायीचे शेण खरेदी करणार आहे त्यामुळे शेणाला खूप मागणी मिळणार आहे.

कोणाला व किती फायदा मिळणार…

पेंट बनवण्यासाठी सरकार गायीचे शेण हे शेतकरी, गोशाला, तसेच गावकऱ्यांकडून विकत घेणार आहे. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात तब्बल ५५ हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेण खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे.

छत्तीसगड सरकारने गोधन न्याय ही योजना सुरु केली आहे या योजनेत गायीचे शेण शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. शेणाला प्रति किलो २ रुपये भाव दिला जातो.

याच योजनेच्या आधारावर ही योजना तयार करण्यात येत आहे. केंद्र सरकार इतर राज्यांमध्येही ही योजना राबविणार असल्याची शक्यता आहे.

रोजगाराच्या संधी वाढणार

सरकार गायीच्या शेणापासून पेंट तयार करण्याचा उद्योग सुरु करणार आहे यासाठी कामगार , तसेच गायीच्या शेणाची खरेदी करण्यासाठी शेतकरी ,गोशाळा, आणि डेअरीचा व्यापार करणार्यांना होणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

WEB TITLE: Farmers will get financial benefit of Rs. 55,000 per annum from cow dung. Central government will buy cow dung.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button