शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) आणलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वृद्धापकाळात योग्य जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाते. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण होताच त्यांना 3000 रुपये मासिक पेन्शन दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी पीएम शेतकरी सन्मान निधीचे (PM Kisan Mandhan Yojana) दोन हजार रुपये आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर पीएम किसान मानधन योजनेनुसार दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळतील. कमीत कमी 660 रुपये वार्षिक तर जास्तीत जास्त 2400 रुपये वार्षिक भरावे लागतील. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan yojana) किसान पेन्शन योजना म्हणूनही ओळखली जाते. या अंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
वाचा –
लाभार्थी –
जर लाभार्थी शेतककऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला 1500 रुपये दिले जातील. या स्कीमसाठी लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. तुमच्या खात्यात पेन्शनचे पैसे डिरेक्ट ट्रान्सफर केले जातील.
असा करा अर्ज –
किसान मानधन योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या साइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मोबाइल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. याठिकाणी तुम्हाला नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, कॅप्चा कोड इ. माहिती द्यावी लागेल.
यानंतर ओटीपी जनरेट होईल, तो प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर एक अॅप्लिकेशन फॉर्म भरून तो सबमिट करावा लागेल.
या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तुम्हाला तो वापरता येईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा