कृषी बातम्यायोजना

Breaking! शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरसाठी 90 टक्के अनुदान; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज, जाणून घ्या पात्रता

Tractor Yojana | भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथे निम्म्याहून अधिक नागरिकांचा प्रमुख व्यवसाय (Business) हा शेतीचा आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच (Agricultural Business) अवलंबून आहे. सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवून शेतकऱ्यांना शेतीसाठी (Farming) प्रोत्साहन देण्याचं काम केलं जातं.

शेतकऱ्यांना शेती (Department of Agriculture) करताना सर्वाधिक गरज भासते ती ट्रॅक्टरची. कारण त्याशिवाय मशागत होतच नाही. आज शेतातील (Agriculture) मेहनतीसाठी भरमसाठ पैसे घेतले जातात. जे शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणूनच ट्रॅक्टर योजना राबवली जाते. तुम्हीही ट्रॅक्टर (Tractor Subsidy) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

मिनी ट्रॅक्टर अनुदान
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून स्वसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर (Subsidy) मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जातात. याच संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. स्वसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor Subsidy) व त्याच्या उपसाधनांसाठी 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू झाले आहेत. हे अर्ज 23 डिसेंबर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना (Type of Agriculture) करण्यात आले आहे.

वाचा: शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट! केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेची वाढवणार रक्कम, जाणून घ्या

लाभासाठी अशा आहेत अटी
• बचत गटातील सदस्य राज्याचे रहिवासी असावेत. • बचत गटातील 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.
• सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावे.
• यापूर्वी या संबंधीच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

वाचा: आता यूपीआयवर पैसे ट्रान्सफर करण्यावर लिमिट, जाणून घ्या किती पैसे करता येणार ट्रान्स्फर?

कशाप्रकारे मिळेल अनुदान?
मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख एवढी आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या व प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button