ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Crop Insurance | बिग ब्रेकींग! शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात २५ टक्के मिळणारं पीक विमा; राज्य सरकारने दिले तब्बल ४०६ कोटी

Big Breaking! Farmers will get 25 percent crop insurance in the first phase; The state government gave as much as 406 crores

Crop Insurance | महाराष्ट्रातील सव्वाकोटी शेतकऱ्यांना पीकविम्याची पहिल्या टप्प्यात २५ टक्के रक्कम मिळणार आहे. राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे ४०६ कोटी रुपये विमा (Crop Insurance) कंपन्यांना वितरीत केले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी ४० लाख ९७ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. मात्र, पेरणीनंतर काही दिवसांनी पावसाचा मोठा खंड पडला आणि राज्यातील जवळपास आठशेहून अधिक महसूल मंडळांमधील पिकांना त्याचा फटका बसला. तर पाण्याअभावी पिकांची उत्पादकता देखील कमी झाली.

पावसाचा खंड
राज्यातील नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ४० टक्के सुद्धा पाऊस झाला नाही. त्यावेळी ४५६ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड एक महिन्याचा होता. दुसरीकडे ५८८ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवस पाऊसच नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली.

वाचा : Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा धडाकेबाज निर्णय! फक्त एकाच रुपयात निघणार पिक विमा, जाणून घ्या घोषणा

शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम
‘एक रुपयात पीकविमा’मधील शेतकरी हिश्शाची रक्कम विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती. त्यामुळे कंपन्या गप्प होत्या. आता सरकारने पैसे वितरीत केले असून तत्पूर्वी, विम्यापोटी केंद्र व राज्य सरकारचा तीन हजार कोटींचा हिस्सा देखील कंपन्यांना मिळालेला आहे. विमा कंपन्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर कृषी विभागाकडून तोडगा काढला जात आहे. एकंदरीत, लवकरच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम
शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही विम्याची रक्कम आणि पेरणी केलेल्या पिकाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असेल. सरासरीत, शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के रक्कम मिळेल.

कसे मिळेल रक्कम?
शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.

शेतकऱ्यांसाठी दिलासा
पावसाअभावी खरीप वाया गेलेल्या शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासादायी निर्णय आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत होईल.

हेही वाचा :

Web Title: Big Breaking! Farmers will get 25 percent crop insurance in the first phase; The state government gave as much as 406 crores

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button