योजना

Warehousing Subsidy | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी ५०% अनुदान, जाणून घ्या कसा करावा अर्ज|

250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी 50% अनुदान

Warehousing Subsidy | राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान: कडधान्य (Pulses) आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम (Warehousing Subsidy) बांधकामासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचे फायदे:

  • २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी ५०% अनुदान (grant)
  • अनुदान रक्कम थेट शेतकरी उत्पादक कंपनी/संघाच्या खात्यात जमा
  • बँक कर्जासह योजना राबवणे शक्य
  • शेतकऱ्यांना कृषी माल साठवण्यासाठी योग्य आणि माफक दर

वाचा:Bright future| मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी! जन्मापासून सुरू करा एसआयपी आणि जमा करा 14 लाख रुपये!

अर्ज कसा करावा:

  • तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करा.
  • आवश्यक कागदपत्रे: सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील
  • अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२४

शेतकऱ्यांना आवाहन:
या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शेतकरी (farmer) उत्पादक संघ आणि कंपन्यांनी पुढे येण्याचे आवाहन हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

योजनेचे महत्त्व:
शेतमाल साठवणुकीसाठी योग्य आणि माफक दरातील (Modest rate) सुविधा उपलब्ध करून देणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल योग्य वेळी आणि योग्य किंमतीला विकण्यास मदत होईल. तसेच, योजनेमुळे शेतमालाची नुकसान कमी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button