शेतकऱ्यांनो ऊस कोणाला द्यायचा विचार करत आहात? तर रेड झोनमधील कारखान्यांची यादी पहाच…
गेल्यावर्षीच्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) काही साखर कारखान्यांनी रास्त व किफायतशीर ऊसदराची (एफआरपी) (FRP) संपूर्ण रक्कम अद्याप दिलेली नाही. अशा कारखान्यांकडील थकीत रकमेची वसुली करण्याबाबत (आरआरसी) साखर आयुक्तांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच, कोणत्या कारखान्यांना यावर्षी ऊस द्यायचा, याचा योग्य निर्णय शेतकऱ्यांनी घेता यावा, यासाठी साखर आयुक्तालयाकडून रेड झोनमधील कारखान्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ती आपण सविस्तर पाहुया..
वाचा –
- पीएम किसान योजनेच्या समस्या सोडवण्यात अधिकारी असमर्थ; अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे..
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त कारखाने-
गेल्यावर्षी गाळप हंगामात काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची (FRP) संपूर्ण रक्कम वेळेत दिली. तर, काही कारखान्यांनी कालावधी उलटूनही एफआरपीची (FRP) रक्कम दिलेली नाही. शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमिष दाखविणे, ऊस गाळपास नकार, हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना रक्कम अदा करून शेवटच्या महिन्यात रक्कम थकीत ठेवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा कारखान्यांविरुद्ध साखर आयुक्तालयाकडून आरआरसी (RRC) आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक १३, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एक आणि लातूर जिल्ह्यातील तीन कारखाने आहेत.
वाचा –
एफआरपी थकविणारे कारखाने पहा-
एफआरपी (FRP) थकविणाऱ्या २७ साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक १३ कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा, विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर, मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज उत्तर सोलापूर, लोकमंगल शुगर इथेनॉल दक्षिण सोलापूर, सिद्धनाथ शुगर मिल्स उत्तर सोलापूर, गोकूळ शुगर दक्षिण सोलापूर, मातोश्री लक्ष्मी को-जेन अक्कलकोट, जयहिंद शुगर आचेगाव, विठ्ठल रिफाइंड शुगर्स करमाळा, गोकूळ माऊली शुगर्स अक्कलकोट, भीमा सहकारी साखर कारखाना मोहोळ, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना पंढरपूर या कारखान्यांचा समावेश आहे.
तरी शेतकऱ्यांना नियमित एफआरपी देणारा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना कोणता हे ऊस पुरवठादार शेतकऱ्याला समजणे आवश्यक आहे. त्यानुसार नियमित एफआरपी देणारे, हंगाम संपूनही मुदतीत एफआरपी न देणाऱ्या आणि आरआरसी आदेश जारी केलेल्या कारखान्यांची माहिती आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.अशी माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा –