कृषी बातम्या

शेतकरी ‘सेंद्रिय उत्पादने’ परदेशात विकणार: सरकार कडून “महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा” ची स्थापना; पहा “ते” जिल्हे कोणते?

Farmers to sell 'organic products' abroad: Establishment of "Maharashtra Organic Certification System" by the government; See "Which" districts?

सेंद्रिय शेतीमधून उत्पादन घेणाऱ्या लोकांसाठी एक दिलासायक बातमी आहे. राज्य शासनाने (By the state government) महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन केली आहे. सेंद्रिय शेतीतुन उत्पादन निर्माण करणार्यांना “सेंद्रिय उत्पादन” (Organic production) ही मान्यता देण्यात येणार आहे. कोल्हापूरसह राज्यात 8 क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यात आलेली असल्याने या चांगल्या बातमीमुळे सेंद्रिय शेतीतुन उत्पादन घेणाऱ्याला दिलासा मिळालेला आहे.

“सेंद्रीय उत्पादने” म्हणून मान्यता मिळणार..

सेंद्रिय पिकांची लागवड (Cultivation of organic farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमधून घेतलेल्या उत्पादनांची विक्री करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. सेंद्रिय पध्दतीने पिकविलेल्या शेतीला सेंद्रिय उत्पादन म्हणून विक्री करताना अडचणी येतात याचा विचार करून राज्यशासनाने एक निर्णय घेतला आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन करत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने “महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा” (Maharashtra Organic Certification System) स्थापन केलेली आहे. या स्थापणेद्वारे शेतकऱ्यांना सेंद्रिय पिकांतून घेतलेल्या उत्पन्नाला “सेंद्रिय उत्पन्न” म्हणून मान्यता दिली जाणार आहे. आणि या उत्पादनाची विक्री शेतकरी फक्त देशातच नाही तर परदेशात सुद्धा करू शकणार आहे.

वाचा: कमी मेहनतीत व कमी खर्चात वर्षाला काढा 25 लाख उत्पन्न; पहा कोणती आहे “ही” शेती..

वाचा: अबब! हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानचा वापर करून मिळावा दुग्ध जनावरांसाठी 10 दिवसात चारा…

“या” ठिकाणी यंत्रणेची स्थापना..

पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, ठाणे, लातूर व अकोला या आठ ठिकाणी क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात येणार आहे.

सेंद्रिय शेतीचा फायदा..

शेतकरी (Farmers) आता सेंद्रिय शेतीकडे (Towards organic farming) वळलेला दिसून येतो. रासायनिक खतांचा वापर करण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर करून पिके घेऊ लागला आहे. यामध्ये पण शेतकऱ्यांचा फायदाच आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या, फळे यांची मागणी भरपूर प्रमाणात वाढत आहे. पुढे सेंद्रिय उत्पादने म्हणून मान्यता (approval) मिळाल्यानंतर शेतकरी प्रदेशात उत्पादने विकू शकणार आहे. या मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button