शेतकऱ्यांनो “मृदा आरोग्य कार्ड योजने”चा लाभ घ्या; शेतीमध्ये वाढेल दुप्पट उत्पन्न, पहा या योजनेविषयी सविस्तर…
शेतकरी (farmers) शेतीमधून पिके (crop) घेत असतो. पण त्या पिकांची गुणवत्ता जमिनीच्या मातीवरून ठरत असते. जमिनीतील मातीवरून उत्पादन ठरत असते. शेतकऱ्यांना (farmers) उत्पादन वाढवायचे असेल तर जमिनीतील माती कोणत्या पिकासाठी पोषक आहे हे माहीत असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून भारत सरकारच्या (Government of India) वतीने शेतकर्यांच्या हितासाठी सन 2015 मध्ये मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card) योजना सुरू गेली आहे. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया…
वाचा-
या योजनेचा फायदा –
मृदा कार्ड योजनेमधून (soil card scheme) शेतकऱ्यांना जमिनीचा अभ्यास करता येणार आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना (farmers) स्वतःच्या पिकांसाठी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड (Health Card) दिले जाणार आहे. यामध्ये जमिनीतील मातीच्या प्रकारविषयी व मातीच्या गुणवत्तेविषयी सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार. शेतजमिनीत गुणवत्ता कमी असेल तर सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले जाते. जेणेकरून शेतकरी चांगले उत्पन्न घेऊ शकेल.
मृदा आरोग्य कार्डचा कालावधी –
मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card) हे एक रिपोर्ट कार्ड आहे ज्यामध्ये मातीच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली जाणार. केंद्र शासनाच्या (Central Government) वतीने मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card) प्रत्येक 3 वर्षात शेतकर्यांना दिले जाईल. शेतकर्यांना त्यांच्या शेतीच्या गुणवत्तेनुसार हे कार्ड दिले जाईल जे 3 वर्षांसाठी 1 वेळा असेल.
वाचा- शेतकऱ्यांनो तमालपत्राच्या शेतीतून कमवू शकता लाखों रुपये; पहा किती मिळते उत्पन्न…
मृदा आरोग्य कार्डसाठी नोंदणी अशी करा –
1) माती आरोग्य कार्ड योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर https://soilhealth.dac.gov.in/ अर्जदारास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागणार आहे.
2) अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर पुढील मुख्यपेज ओपन होईल. या पेजवर लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, समोर पेज ओपन होईल, या पृष्ठावर तुम्हाला आपले राज्य निवडावे लागेल.
3) राज्य निवडल्यानंतर, Continue बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर, समोर पृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
4) या पृष्ठावरील, आपण लॉगिन फॉर्म उघडता, याकरिता आपल्याला खाली New Registration पर्यायावर क्लिक करावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म आपल्यासमोर उघडेल.
5) या नोंदणी फॉर्ममध्ये आपल्याला User Registration Details, Language, User Details, Users Login Account इत्यादी विचारलेल्या सर्व माहिती भराव्या लागतील.
6) सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. मुख्यपृष्ठावर आपल्याला लॉगिन फॉर्म उघडावा लागेल.
7) आपल्याला Login Form मध्ये आपले User Name आणि Password प्रविष्ट करावा लागेल. अशा प्रकारे आपण मृदा हेल्थ कार्डसाठी ऑनलाइन प्रकारे अर्ज करू शकता.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –