lang="en-US"> Farmers Suicide | महाराष्ट्रात दुष्काळाच्या सावलीत १३७० शेतकऱ्यांचा मृत्यू! - मी E-शेतकरी

Farmers Suicide | महाराष्ट्रात दुष्काळाच्या सावलीत १३७० शेतकऱ्यांचा मृत्यू! जाणून घ्या सविस्तर

Farmers Suicide | दुष्काळ, नापिकी आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तींमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर (Farmers Suicide) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात राज्यात तब्बल १३७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या १५ महिन्यांत ३५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील काही वर्षांपासून राज्यात दररोज सरासरी ७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दिसून येते.

वाचा: महाराष्ट्रावर चक्रावर वाऱ्याचे संकट! मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला विजांसह झोडपून काढणार पाऊस

यात अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश सर्वाधिक आहे. यंदा ऑक्टोबर २०२३ मध्ये दुष्काळ जाहीर झाल्यापासूनच १३७० शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत.

दुष्काळामुळे पिके नष्ट झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचे बोझा वाढले. याचसोबत, अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु ते अजूनही पूर्ण झाले नाही. यामुळे नैराश्यग्रस्त होऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियमांमध्ये सुधारणा! आता चाचणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज संपली

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणावर राज्य सरकारने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. कर्जमाफी त्वरित पूर्ण करणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे यासारख्या उपाययोजना तातडीने राबवणे गरजेचे आहे. दुष्काळ, नापिकी आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तींमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version