नादचखुळा! थेट युट्यूबवर व्हिडिओ पाहून शेतकऱ्याने केली ‘या'- मी E-शेतकरी
यशोगाथा

Business | नादचखुळा! थेट युट्यूबवर व्हिडिओ पाहून शेतकऱ्याने केली ‘या’ व्यवसायाला सुरुवात; जाणून घ्या किती कमावतोय नफा

Business | आपल्याला आश्यर्य वाटेल की आपण खेकडा पालन देखील करू शकतो अर्थात त्याला इंग्रजीत क्रॅब असे म्हणतात. तसेच शाकाहारी लोकांसाठी (Vegetarian) हा एक विचित्र प्राणी असला तरी मांसाहारी खास करून मासे प्रेमींसाठी खेकडा ही एक मेजवानी असते. चला तर मग जाणून घेऊयात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा..

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असा व्यवसाय म्हनून खेकडा पालन व्यवसाय चालु केला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी भारत जहरव यांनी स्वता:च्या 20 बाय 50 आणि आठ फूट खोल शेतात शेततळे तयार करून त्यात खेकडा पालन व्यवसाय (Business) सुरू केला आहे. पण आता या शेततळ्यात 2 क्विंटल खेकड्याचे नर व मादी रोपे आणून सोडले आहेत. तसेच या सर्व खेकडापालन व्यवसाय बद्दल माहिती त्यांनी youtube वरून घेतली आहे.

वाचा: आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली; त्वरित तपासा तुमचं नाव आलं का?

कसा सुरू केला या शेतकऱ्याने खेकद्यांचा व्यवसाय?

हिंगोली जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शेतकरी भारत जहरव यांनी स्वतःच्या शेतामध्ये वीस बाय पन्नास आणि आठ फूट खोल शेततळे तयार केलं आणि त्यात खेकडे पालन सुरू केलं आहे. तसेच या व्यवसायातून यावर्षी त्यांना सहा लाख रुपये उत्पादन देखील मिळाले आहे. यूट्यूबवर भरत यांनी खेकडा पालनाचा व्हिडीओ पहिला आणि पाहताच क्षणी हा उपक्रम आपणही राबवायचा ठरवले. तसेच शेततळ्यात काही प्रमाणात माती टाकली, आणि त्यानंतर बीज रुपात 2 क्विंटल खेकडे या शेततळ्यात सोडण्यात आले. तसेच एक वर्ष हे खेकडे जोपासण्यात आले.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी ‘इतकं’ वाढीव अनुदान; महत्त्वपूर्ण अटही रद्द

हा शेतकरी वर्षाला घेतोय 6 लाखांचे उत्पन्न

या व्यवसायात खेकड्यांना जोपासण्यासाठी गुंतवणुकी (Investment) व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही. तसेच चिकन आणि मासे यातील वेस्टेज या खेकड्यांना खायला दिले जाते. तसेच दर आठ दिवसाला शेत तळ्यातील पाणी बदलून काळजी घेतली जाते. आणि यातून फक्त 9 महिन्यात विक्रीलायक खेकडे तयार झाले आहेत. तसे जवळपास 12 क्विंटलहून अधिक खेकडे या शेत तळ्यात विक्रीसाठी तयार आहेत. तसेच खेकड्याला आयुर्वेदिक महत्त्व मोठे असल्याने मागणी देखील जास्त असते. त्यामुळे 500 रुपये किलोप्रमाणे ह्या खेकड्याची विक्री होत आहे. या व्यवसायात (business) आतापर्यंत त्यांना खेकडा पालन उभारणी साठी जवळपास 4 लाख रुपये खर्च झाला आहे आणि यातून फक्त 9 महिन्यात 6 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. तसेच अजुन देखील उत्पादनाद वाढ होईल अशी आशा भारत जहरव यांना आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : The farmer of Hingoli did the best! Started ‘crab farming’ business by watching videos on YouTube; Let us know the plight of these farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button