शेतकऱ्यांनो जनावरांचा “मुरघास” असा तयार करा; चारा टंचाईमध्ये येईल उपयोगी…
सर्वसाधारणपणे आपल्याकडे फक्त पावसाळ्यातील तीन ते चार महिने हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु वर्षातील उरलेल्या आठ ते नऊ महिन्यांत हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते या अडचणीवर मात करण्याचा मूरघास रामबाण उपाय आहे. मका ज्वारी इत्यादी एकदल पिकांच्या हिरव्या चाऱ्यापासून मूरघास करता येतो.
वाचा –
मुरघास तयार करण्याची पद्धत –
कुटीयंत्राच्या सहाय्याने चाऱ्याची कुट्टी करून खड्यामध्ये भरावेत. मक्याचे पीक पोटरी वर येऊन दाणे दुधाळ असताना कापावे. ज्वारी किंवा बाजरीचे पीक फुलोऱ्यावर असताना मुरघास करावा. खड्डा भरत असताना वरून सतत दाब द्यावा. त्यामुळे खड्ड्यात हवा भरणार नाही. खड्ड्यांमध्ये हवा राहिल्यास चारा कुजण्यास संभव असतो.
चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्याकरिता द्विदल पिकांमध्ये बारीक तुकड्यावर एक ते 1.5 % गुळाचे पाणी तसेच एकदल पिकांमध्ये 1% युरिया पाण्यात मिसळून फवारावा. खड्डा पूर्ण भरल्यानंतर खड्ड्याच्या पृष्ठभागावर तीन ते चार फूट उंच वैरणीचा निमुळता ढीग करावा आणि त्यावर निरुपयोगी गवत किंवा कडब्याच्या पेढ्याचा भर पसरावा. त्यानंतर शेण व चिखल यांच्या मिश्रणाचा थर देऊन खड्डा झाकून टाकावा. खड्ड्यावर पॉलिथिन पेपर सुद्धा अंतरण्यास हरकत नाही.
वाचा –
मुरघास तयार होण्यास 55 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो त्यानंतर खड्ड्याच्या किंवा पाइपच्या तोंडाला थोडसे भोक पाडून त्यातून रोज मुरघास काढून घ्यावा काढून घेतल्यानंतर त्यावर वाळलेले गवत वगैरे घालून तोंड बंद करावे. दुभत्या जनावरास दररोज 10 ते 15 किलो मूरघास खाऊ घालावा. मुरघास आंबट-गोड चारा असतो त्यामुळे जनावरे तो आवडीने खातात. पावसाळी हंगामात जादा असलेल्या ओल्या वैरणीचा मुरघास तयार करून तुटीचे काळात दुभत्या जनावरांना खाऊ घालावा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा