योजना

नगर मधील शेतकऱ्यांची आंबा,सिताफळ, लिंबाला, पसंती” या योजनेच्या सहाय्याने ” फुलवल्या तब्बल सातपाट फळबाग…

Farmers in the city have planted mango, custard apple, lemon and lime, with the help of this scheme.

🍈 केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी वीज विविध योजना राबवित असते अशाच योजनांचा फायदा नगरकरांनी घेतला आहे. यावर्षी फळबाग शेतीकडे त्यांचे लक्ष गेले आहे.शेती पिकांवर सातत्याने काही ना काही नैसर्गिक संकट येत असल्या कारणामुळे बरेच शेतकरी आता फळबागकडे वळण्याचे पाहायला मिळत आहे.

🍐फळबाग लागवड करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध योजना आहेत, नगर मधील शेतकऱ्यांनी असाच योजनांचा फायदा घेत शेतकऱ्यांनी फळबागांवर मागील वर्षापेक्षा जास्त सात पटीने फळबाग फुलवले आहेत, शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड सुरू आहे. तसेच महात्मा फुले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून देखील फळबाग लागवडीसाठी अर्ज करता येतो,या योजनेचा लाभ फक्त पाच एकराच्या आतील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.

🍋या वर्षी 12 हजार 865 शेतकऱ्यांनी या फळबागा फुलवलेल्या असल्याची माहिती कृषी विभाग दिली आहे. या कामावर सर्वसाधारणपणे 35 कोटी रुपये पर्यंत खर्च आला आहे विशेष म्हणजे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात फळबागांचे उत्पन्न अधिक वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

🍊नगर मधील 12 हजार 865 शेतकऱ्यांनी विविध योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी अर्ज केला आहे त्यातील प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून पाच हजार 447 शेतकऱ्यांनी मार्चअखेरीस तीन हजार 442 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली आहे

⛈️पावसाची अनिश्चितता, वेगवेगळ्या नैसर्गिक संकटे, यावर मात करण्यासाठी नगरकरांनी आंबा सीताफळ लिंबू यासारख्या भागांना प्राधान्य दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button