कृषी बातम्या

पुणे जिल्ह्यातील शेतकरी वीजबिल थकबाकीतून मुक्त; पहा किती मिळाली सवलत?

Farmers in Pune district are free from electricity bill arrears; See how much discount you got?

पुणे जिल्ह्यातील ‘कृषिपंप वीजजोडणी (electricity) धोरण 2020’ या योजनेत सहभागी होत थकबाकी भरलेल्या 1 लाख 8 हजार 130 मधून शेतकऱ्यांना जवळपास 284 कोटी 37 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार १३० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ८४ कोटी ६८ लाख व चालू वीजबिलांच्या ९१ कोटी ६० लाख रुपयांचा भरणा केला आहे.

वाचा : पुढचे 5 दिवस “या” पिकांची अशी घ्या काळजी; अन्यथा नुकसानास बळी पडाल..

वाचा : रुफटॉप सौर योजना यंत्रणेवर 40 टक्के अनुदान; वीज ग्राहकांना कसा घेता येईल लाभ? वाचा सविस्तर

शेतकरी वीज बिलापासून संपूर्ण थकबाकी मुक्त-

या धोरणानुसार कृषिपंपाच्या वीजबिलातून (light bill) थकबाकी मुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकी मध्ये ६६ टक्के सवलत देण्यात येते तर शिल्लक थकबाकी पैकी ५० टक्के थकबाकी मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी देखील माफ करण्यात येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकी पोटी भरलेल्या रकमे एवढी सवलत मिळाली आहे. यामध्ये २८ हजार ५८७ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकी मुक्त झाले आहेत.

सवलत व थकबाकी मिळाली-

त्यांनी चालू वीज बिलासह थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ६९ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकी मध्ये त्यांना आणखी ५३ कोटी २९ लाख रुपयांची सवलत व संपूर्ण थकबाकी मुक्ती मिळाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button