ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Kharif season 2023 | शेतकऱ्यांनो बियाणे, किटकनाशके आणि खते खरेदी करताना ही काळजी घ्या ! नुकसान टाळा अन् मनस्ताप वाचवा…

Kharif season 2023 | लवकरच महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी लगबग सुरू केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची मशागत पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके औषधे खरेदी करावेत, असे आवाहन कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या सूचना

१) शेतकऱ्यांनी कोणतीही बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावीत.
२) या पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी.
३) खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
४) भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद असल्याची खात्री करावी.

पेरणीआधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा

शेतकऱ्यांनी बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यायला हवी. तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरी तपासूनच पेरणी करायला हवी. महत्त्वाची बाब म्हणजे कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री किंवा इतर तक्रारीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

किटकनाशके खरेदी करताना ही काळजी घ्या

याशिवाय किटकनाशके खरेदी करताना आठवणीने ती
अंतिम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोननंबर दिलेले आहेत. त्यामुळे अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क करावा. असेही आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करावे…

राज्यामध्ये मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्यात येत आहे. २९ जून २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज करावा. यासाठी सेतूसुविधा केंद्र, गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

Farmers have to purchase seeds, fertilizers with following instructions

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button