कृषी बातम्याकृषी सल्ला

शेतकरी गटांनी धरली जैविक निविष्ठांची कास! शेती लगतच उभारली जैविक प्रयोगशाळा, वाचा शेतकरी गटाची यशोगाथा…

Farmers' groups seize organic inputs! Organic laboratory set up near agriculture, read the success story of the farmer group

रासायनिक खतांच्या (Of chemical fertilizers) अतिरेकी वापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य, ही कृषी (Agriculture) क्षेत्रासमोरील प्रमुख समस्या ठरली आहे. यावर रामबाण उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठांची कास धरली आहे. वाशिम जिल्ह्यातील एरंडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेताच्या बांधावरच जैविक प्रयोगशाळा उभारून त्यात शेतीला लागणाऱ्या जैविक साहित्याची निर्मिती सुरू केली आहे.

जैविक निविष्ठांचा (biological inputs) उपयोग शेतीत करण्यात येत असून यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे जमिनीचा पोत ही सुधारला आहे.

उद्योग व्यवसाय क्षेत्रातील ‘ज्वारीचे’ महत्त्व! जाणून घ्या; ‘आरोग्यदायी’ ज्वारीचे महत्त्व…

रासायनिक खते व किटकनाशकांच्या (pesticides) अमर्याद वापरामुळे दिवसेंदिवस शेतीचा पोत बिघडत चालला आहे.रासायनिक निविष्ठांवर होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे उत्पादन खर्च वाढला असून त्या तुलनेत उत्पन्न मात्र घटत चालले आहे.

समस्येवर वाशीम जिल्ह्यातील एरंडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत रामबाण उपाय शोधला आहे. एरंडा गावातील जवळपास 16 शेतकऱ्यांनी एकत्र येत जयकिसान शेतकरी गटाची स्थापना केली आणि फार्म लॅब ची स्थापना केली. या प्रयोगशाळेमध्ये स्लरी,डीकंपोस्टिंग कल्चर,लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा (Slurry, decomposting culture, lactic acid bacteria, Trichoderma) या जैविक निविष्ठांची निर्मिती करण्यात येते.

‘अशा’ रीतीने करा कांद्याची साठवण; होणार नाही दोन वर्ष कांदा खराब !

मागील वर्षीच्या कोरोना काळात गावातील 16 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीच्या बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारली व याठिकाणी जैविक निविष्ठांचे उत्पादन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी प्रयोगशाळा उभारण्यासाठी दीड लाख रुपये खर्च केले आहेत. जवळच्या गावातील शेतकऱ्यांना या प्रयोगशाळेचा फायदा होत आहे, असं प्रयोग शाळा संचालक दीपक घुगे यांनी सांगितलं.

शेतीच्या बांधावर सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळे सोबत आज अनेक शेतकरी जोडले जात असून परिसरातील शेकडो एकर शेतीत या जैविक निविष्ठांचा वापर करण्यात येत आहे.यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन कमी होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे शेतीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे.

“या” ट्रॅक्टरमुळे होणारे शेतकऱ्यांचे भरघोस फायदा! जाणून घ्या सविस्तरपणे…

प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्यांच्या एकूण शेतीमध्ये 60 टक्के जैविक खत आणि 40 टक्के रासायनिक खताचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ट्रायकोडर्माचा (Of Trichoderma) वापर केल्यानं शेतीमध्ये त्याचा फायदा दिसून येत असल्याचं नीरज पांडे यांनी सांगितलं आहे. प्रयोगशाळा स्थापन करण्यापूर्वी जयकिसान गटातील 16 शेतकऱ्यांनी पुण्याला जाऊन प्रशिक्षण घेतलं.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

1. शेतकऱ्यांना होणार बंपर कमाई! जाणून घ्या; शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ‘मल्टि्लेअर फार्मिंग ‘बद्दल सर्व माहिती…

2. जिओ कंपनीची भन्नाट ऑफर! आता 5 जीबी ‘इमर्जन्सी डेटा लोन’ मिळणार, वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button