ताज्या बातम्या

Dairy Cattle Subsidy | पशुपालकांसाठी मोठी बातमी! दुधाळ जनावरांवर मिळणारं तब्बल ७५ टक्के अनुदान; त्वरित ‘असा’ करा अर्ज

Big news for ranchers! As much as 75 percent subsidy on milch animals; Apply immediately

Dairy Cattle Subsidy | राज्यातील पशुपालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे (Dairy Cattle Subsidy) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि जमातींमधील पशुपालकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दहा शेळ्या, मेंढ्या किंवा गाय गटामध्ये दोन गायी वितरित करण्यात येतील. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास ९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून, महिनाभर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

 • योजनेसाठी पात्रता
 • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
 • लाभार्थीचा पशुपालन व्यवसाय असावा.
 • लाभार्थी हा अनुसूचित जाती आणि जमातीमधील असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल.
 • अर्ज कसा कराल?
 • योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाबीएमएस या वेबसाईटला भेट द्या.
 • या वेबसाईटवर जाहिरात दिलेली आहे. त्या जाहिरातीवर क्लिक करून अर्जाची माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे याची माहिती मिळू शकते.
 • अर्ज भरल्यानंतर तो संबंधित जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात सादर करावा लागेल.

वाचा : Zika virus | पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेवर झिका व्हायरसची दहशत; भाविकांनी घ्यावी काळजी

 • अर्ज करण्याची शेवटची तारीख
 • योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास ९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर 2023 आहे.

Web Title: Big news for ranchers! As much as 75 percent subsidy on milch animals; Apply immediately

One Comment

 1. मी शेतकरी असुन आमच्याकडे जनावरे अनेक दिवसांपासून वडिल उपारजीत शेती बरोबर उधोग आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button