शेतकऱ्यांनो, मका पिका संबंधित असलेला हा व्यवसाय माहित आहे का? कमवू शकता दिवसाला 5 हजार रुपये…
Farmers, do you know this business related to maize crop? You can earn 5 thousand rupees a day
शेतकऱ्यांनी (farmer) मका लागवड (Maize planting) केली तर शेतकऱ्यांना कॉर्नफ्लेक्स तयार करण्याचा उद्योग फायदेशीर ठरु शकतो. या व्यवसायाच्या शेतकरी (farmers) दिवसाला चार ते पाच हजारांची कमाईही करु शकतात. या हिशेबाने महिन्याला लाखो रुपयांची कमाई होऊ शकते.
वाचा –
बाजारपेठेत कॉर्नफ्लेक्सला कायमच चांगली मागणी असते. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मक्याचे उत्पादन घेऊन हा व्यवसाय केला तर फायद्यात आणखी भर पडू शकते. याशिवाय साठवणुकीसाठीही जागा आवश्यक आहे. या व्यवसायासाठी लागणार्या मशिन, वीज सुविधा, जीएसटी क्रमांक, कच्चा माल, जागा आणि साठा ठेवण्यासाठी गोदाम लागेल. याची शेतकरी सुविधा उत्तम करू शकता.
वाचा –
या मशीन चा उपयोग गहू, तांदळाचे फ्लेक्स बनवण्यासाठी ही होतो –
या व्यवसायात वापरल्या जाणार्या या मशिन्सचा उपयोग मक्यापासून बनवलेले कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठीच केला जात नाही, तर गहू आणि तांदळाचे फ्लेक्स बनवण्यासाठीही वापरता येतो. शक्यतो मक्याचे जास्त उत्पादन असलेल्या भागात हा व्यवसाय सुरू करा. अशी जागा शोधा जिथे आपल्याला चांगल्या प्रतीचा मका मिळेल किंवा तो स्वतः पिकवता येईल.
किती फायदा होईल?
एक किलो कॉर्न फ्लेक्स बनवण्याची किंमत सुमारे 30 रुपये आहे आणि बाजारात ते 70 रुपये किलो दराने सहज विकले जातात. जर तुम्ही एका दिवसात 100 किलो कॉर्न फ्लेक्स विकले तर तुमचा नफा सुमारे 4000 रुपये होईल. दुसरीकडे, जर तुम्ही महिन्याचा आकडा काढला तर तुम्हाला 1,20,000 रुपयांपर्यंत कमाई होईल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –
Edited Sep 5