
शेतकऱ्यांचे (farmers) शेतमालाचे नुकसान पाहून, शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत दिसत होती. पण आता केंद्र सरकार (Central Government) व राज्याकडून (state) शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याकडून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने (Central Government) विमा अनुदानाचा पहिला हप्ता जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (farmers) दिवाळी धमाक्यात साजरी होणार असल्याचे दिसत आहेत.
वाचा –
शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत –
शेतकऱ्यांना (farmers) दिलासा मिळालेला आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचा महाविकास आघाडीचा हात दिला आहे. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे.
वाचा –
75 टक्के मदतनिधीप्रमाणे मंजूर 2860 कोटींपैकी 502.37 कोटी रूपये निर्गमित –
शासनाच्या (Government) निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात येणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के मदतनिधीप्रमाणे मंजूर 2860 कोटींपैकी 502.37 कोटी रूपये (मराठवाड्यात सर्वाधिक) निर्गमित झाले आहेत.
केंद्र शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता जारी –
शेतकऱ्यांना (farmers) वाटण्यासाठी केंद्र शासनाने (Central Government) विमा अनुदानाचा पहिला हप्ता जारी केला आहे. पहिल्या हप्त्यापोटी 899 कोटी रुपये विमा कंपन्यांना कंपन्याकडे वर्ग करण्यात आलेत. त्यामुळे काही अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
वाचा –
लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार –
शेतकऱ्यांना (farmers) मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. यापूर्वी सरकारने 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे
कोणत्या विमा कंपनीला किती रक्कम
1)रिलायन्स कंपनीला 165 कोटी 58 लाख
2) इफ्को कंपनीला 161 कोटी 99 लाख
3) एचडीएफसी ला 116 कोटी 20 लाख
4) भारती एक्सा 92 कोटी 24 लाख
5) बजाज अलायन्स ला 107 कोटी 62 लाख
6)भारतीय कृषी विमा कंपनीला 254 कोटी 92 लाख
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –