शेतकऱ्याने फक्त एक एसएमएसने ‘या’ तारीख पर्यंत करा आधार-पॅन लिंक; लिंकिंग न केल्यास येईल पैसे काढण्यास अडचण…
Farmers can send Aadhaar-PAN link till 'Yaa' date with just one SMS; If there is no linking, there will be difficulty in withdrawing money ...
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI) ने गुंतवणुकदारांना 30 सप्टेंबरपर्यंत पॅनसोबत आधार लिंक (ADHAAR PAN LINK) करण्यास सांगितले आहे. अस न केल्यास तुम्हाला पैसे काढण्या मध्ये अडचण निर्माण होणार आहे.
आधार-पॅन लिंक न केल्यास..
पॅन (ADHAAR PAN LINK) अमान्य घोषित केले जाईल, ज्यामुळे त्यांना ट्रांजक्शन (transaction) करण्यात समस्या येऊ शकतात. पॅन-आधार तुम्ही एका एसएमएसने लिंक करू शकता, ही पद्धत जाणून घेवूयात…
आधार-पॅन लिंक असे करा…
आपल्या मोबाईल मध्ये UIDPN टाइप करून एक स्पेस द्या परत यानंतर आधार नंबर टाइप करून पुन्हा एकदा स्पेस द्या आणि पॅन नंबर टाइप करा.
उदाहरण: UIDPN (SPACE) Aadhar (SPACE) Pan आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा.
वरील प्रोसेस केल्यावर आधार-पॅन लिंक होईल.
वाचा : SBI ग्राहक आता कर्ज रक्कम सहज मिळवू शकतील; तपासा आपली कर्ज मर्यादा आणि अटी..
लिकिंगचे हे आहेत फायदे…
- पॅन निष्क्रिय होणार नाही. पॅन निष्क्रिय झाले नाही तर पैसेही अडकणार नाहीत आणि बँक अकाऊंट (bank account) सुद्धा फ्रीज होणार नाही.
- शेयर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आधार-पॅन लिंकिंग आवश्यक आहे आणि जे लिंकिंग करणार नाहीत त्यांना जास्त टीडीएस भरावा लागेल.
- आधार-पैन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. यानंतर विलंब शुल्क भरावे लागू शकते.
वाचा : तब्बल ३०० च मायलेज: पेट्रोल-डिझेल पासून सुटका, सर्वसामान्यांना देखील परवडणारी आली इलेक्ट्रॉनिक कार..
लिकिंगचे इतर मार्ग…
मार्ग 1. जर वापरकर्त्यांना त्यांचे पॅन कार्ड आणि आधार क्रमांक मॅन्युअली लिंक करायचे असतील तर ते जवळच्या सेवा केंद्राला भेट देऊन करू शकतात. पॅन कार्ड आणि आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी, ‘Annexure- I’ नावाचा फॉर्म भरून सबमिट करावा लागेल.
यासह तुम्हाला पॅन आणि आधार कार्डची प्रत सादर करावी लागेल. ऑनलाइन सेवेप्रमाणे ही सुविधा मोफत नाही. दोन कागदपत्रांमध्ये मॅन्युअली सामील होण्यासाठी तुम्हाला निर्धारित शुल्क भरावे लागेल.
मार्ग 2. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये त्यांच्या सेवांच्या यादीमध्ये ‘लिंक आधार’ चा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे वापरकर्त्यांना त्यांचे तपशील जसे की नाव,
पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP देखील येईल. ओटीपी भरल्यानंतर तपशील सत्यापित केला जाईल आणि दोन्ही कागदपत्रे जोडली जातील.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :