रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. विद्राव्य खताचेही प्रमाण अधिक आहे. अजून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना विद्राव्य खतांची पूर्ण माहिती नसल्यामुळे विद्राव्य खतांच्या नावाखाली पावडर विकली जाण्याचे प्रकार घडतात. विद्राव्य खते ही साधारणपणे नायट्रोजन, फास्फोरस आणि पोटॅशियम या तीन मूलद्रव्यांपासून तयार केलेले असतात. रासायनिक खते असो किंवा विद्राव्य या खतांमध्ये भेसळ असते का हे ओळखणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे असते.
वाचा –
पिकांसाठी खते खरेदी करताना पैसेही तसेच गुंतवावे लागतात. मग घेतलेली खते तेवढी खात्रीचे आहेत हे तपासणे देखील तितकेच गरजेचे आहे. भेसळयुक्त खते पिकांसाठी हानिकारक ठरू शकतात. कष्टाने वाढवलेल्या पिकांचे नुकसान आपण स्वतः करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
रासायनिक खतांची शुद्धता अशी तपासा –
युरिया- तपास नळीत एक ग्रॅम युरिया, पाच ते सात थेंब सिल्वर नाइट्रेट, 5 मी डिस्टिल्ड वॉटर मिसळून ढवळल यास द्रावण पांढरे झाल्यास समजावे युरियात भेसळ आहे. किंवा एक ग्रॅम युरिया तपासणीत गरम केल्यास संपूर्ण युरिया विरघळला नाही तर भेसळ आहे असे समजावे.
डीएपी- एक ग्रॅम डीएपी खत, पाच मिलि डिस्टिल्ड वॉटर,01 मिली आम्ल मिसळून हलवा. संपूर्ण डीएपी विरघळले नाहीतर भेसळ आहे असे समजावे. म्युरेट ऑफ पोटॅश-01 ग्रॅम खत, 10 मिली पाणी तपास नळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे. याशिवाय पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ आहे असे समजावे.
वाचा –
सिंगल सुपर फास्फेट- एक ग्रॅम खत, पाच मिनिट डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये एक थेंब(2 टक्के)डिस्टील्डअमोनियम हायड्रॉक्साइड आणि एक मिली सिल्वर नायट्रेट मिसळले तर द्रावणासपिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.
फेरस सल्फेट- 1 ग्रम खत आणि पाच मिलि पाणी मिसळा. त्यात एक मुली पोटॅशियम फेरोसीनाईडमिसळल्यास मिश्रण निळे बनेल. अन्यथा भेसळ समजावे. (कृषिमंत्री)
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा