ताज्या बातम्या

पीक विमा अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; कोऱ्या फॉर्म वर सही करू नका, शेतकऱ्यांना दिल्या सूचना..

नुकसानग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा (Crop Insurance) योजनेची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी सांगितले होते. यानुसार जिल्ह्यात १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४२ मंडळ पैकी ३० मंडळ मध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

वाचा –

कोऱ्या कागदावर सही करताना सावधान –

पंचनामे करणारे अधिकारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईच्या फॉर्मवर फक्त शेतकऱ्याचे नाव टाकून कोऱ्या फॉर्मवर कोणतीही नुकसान भरपाईची आकडेवरी न टाकता शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत. आपण कोऱ्या फॉर्मवर सही केल्यास आपल्या सहीचा फॉर्मवर विमा कंपनीचे अधिकारी आपले झालेले नुकसान कमी दाखवून आपल्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना काळजी घेण्यास सूचना दिल्या आहेत.

वाचा –

पूर्ण फॉर्म भरल्यावरच सही करा –

शेतातील पीक नुकसानीचा फॉर्मवर शेतकऱ्यांचे नाव, गट नं, क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी पूर्ण योग्य रित्या संपूर्ण फॉर्म भरलेली पडताळणी केल्याशिवाय सही करू नये. संपूर्ण माहिती योग्य रित्या भरावी व ७० टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवुन आपली सही व पाच साक्षीदारांच्या सह्या कराव्यात. आपण केलेल्या नोंदणी व योग्य ती कार्यवाही होऊन आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. काही तक्रार असल्यास संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button