“या” कारणामुळे शेतकरी कर्जमाफी लाभापासून वंचित; शेतकऱ्यांनो ही चूक त्वरित दुरुस्त करा, अन्यथा होईल नुकसान..
महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना २०१९ संदर्भातील एक महत्वाची अपडेट आहे. कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जवळजवळ ३५ लाख लाभार्थ्यांची खाती पात्र झालेली आहेत. यामध्ये ३० लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम वितरीत करण्यात आलेली असून त्यांना लाभ देण्यात आलेला आहे. उर्वरित प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणपणे ४ ते ५ हजार शेतकरी अद्याप देखील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. जवळजवळ ४ ते ५ लाख शेतकर्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. याचे कारण आधार प्रमाणीकरण आहे. आधार प्रमाणीकरण न झाल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले दिसून येत आहेत.
वाचा –
आधार प्रमाणीकरण महत्त्वाचे –
वाशीम, उस्मानाबाद जिल्ह्यामधून तसेच अहमदनगर जिल्ह्यामधून आधार प्रमाणीकरण न झाल्याने शेतकर्यांनी तत्काळ आपले आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. याच्या संबंधातील जालना जिल्ह्याच्या उपनिबंधक याच्या माध्यमातून देखील एक प्रेस नोट काढून अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे. याच्या संबंधातील एक महत्वपूर्ण प्रेस नोट सविस्तर पाहुया..
शासन निर्णय –
१) २७.१२.२०१९ नुसार दि. १.०४.२०१५ ते ३१.०३.२०२१ या कालावधीमध्ये पिक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना २०१९ हि योजना सुरु करण्यात आलेली असून मा. प्रधान सचिव यांनी दि १४.१०.२०२१ रोजी या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत आज अखेर एकूण १,७१,६२५ इतक्या पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झालेल्या असून त्यापेकी एकूण १,६७,६२९ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून ३९९५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.
वाचा –
2) या योजनेचे अंमलबजावणीचे कामकाज नजीकच्या काळात अंतिम टप्प्यात येणे आवश्यक आहे. योजनेतील 3995 पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही संबंधित लाभार्थ्यांनी अध्याप आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याने त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या अनुषंगाने योजना अंमलबजावणीमधील आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरण या टप्प्यावरील प्रलंबित कामकाज विशेष मोहिमेद्वारे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
3) यासाठी दि 15.10.2021 ते 15.11.2021 या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरण तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, संस्था कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
4) या विशेष मोहिमे अंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासोबत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय व बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा