ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेल्यानंतर त्याचे पैसे एफआरपी (FRP) नुसार व वेळेत देण्यास टाळाटाळ करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कारखान्यांना लगाम घालण्यासाठी साखर आयुक्तांचे प्रयत्न चालू आहेत. शासनाच्या (government) आदेशाने यावर्षीचा गळीत हंगाम 15 ऑक्टोंबर पासून सुरू झाला. यावर्षीच्या गळीत हंगामात आपला ऊस कारखान्यांना देताना शेतकऱ्यांनी (farmers) एफआरपी (FRP) नुसार वेळेत पैसे न देणाऱ्या कारखान्याबाबत खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या आहेत.
वाचा –
वेळेत एफआरपी अदा करणारे कारखाने…
मुक्तेश्वर शुगर मिल धामोरी बुद्रुक (ता.गंगापूर) छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग चितेपिंपळगाव, समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट एक-दोन द्वारकाधीश साखर कारखाना शेवरे.
एफआरपी अदा न केलेले कारखाने…
शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा, घृष्णेश्वर शुगर खुलताबाद, पियूष शुगर वाळकी, एस.जे शुगर रावळगाव.
एफआरपी नुसार उशिरा पैसे अदा करणारे कारखाने…
बारामती ॲग्रो (Baramati Agro) कन्नड, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण, गंगामाई इंडस्ट्रीज शेवगाव,युटेक शुगर मलकापूर, राहुरी सहकारी साखर कारखाना, इंडिकाँन प्रायव्हेट लिमिटेड अंबिकानगर कर्जत, साईकृपा साखर कारखाना श्रीगोंदा, जय श्रीराम शुगर हदगाव, क्रांती शुगर पारनेर, कादवा सहकारी साखर कारखाना दिंडोरी, वसंतदादा पाटील सहकारी कारखाना विठेवाडी, सातपुडा तापी सहकारी साखर कारखाना शहादा, आदिवासी ससाक नवापूर, संत मुक्ताबाई कारखाना मुक्ताईनगर.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –