शेतकरी मित्रांनो; “या” म्हशीची किंमत पाहिली का? दिवसाला देते तब्बल 33 लिटर दूध..
शेतकऱ्यांना शेती (Agriculture) प्रमाणेच दुग्ध व्यवसाय (Dairy business) देखील तितकाच परवडतो. दुग्ध व्यवसाय (Dairy business) मधून लाखों रुपये शेतकरी घेत असतो. जास्त प्रमाण पाहिले तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी एक तरी म्हैस आहे. बरेच शेतकरी (Farmers) व पशुपालक म्हशी पाळतात. या म्हशींच्या किमती देखील खूप असतात. आता आपण सरस्वती म्हशीची किंमत पाहणार आहोत. ती एकूण कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल.
वाचा –
या म्हशीची किंमत लाखात –
पंजाबमधील लुधियाना येथील म्हैस खूप प्रसिद्ध आहे, तिचे नाव ‘सरस्वती’ आहे. ‘सरस्वती’ नावाच्या म्हशींची किंमत आहे तब्बल 51 लाख रुपये. लुधियाना येथील शेतकरी (Farmers) पवित्रा सिंह यांनी ही म्हैस हरियाणातील हिसार येथील शेतकऱ्याकडून ५१ लाख रुपयांना विकत घेतली आहे.
या म्हशीचे बछडे जन्माला येण्यापूर्वीच 11 लाख रुपयांना विकले गेले. माचीवाड्यापासून 8 किमी अंतरावर असलेल्या राजूर गावात राहणाऱ्या पवित्रा सिंह या शेतकऱ्याने ते विकत घेतले आहे. हे शेतकरी 17 एकरवर शेती करतात, तसेच दुग्धव्यवसाय चालवतात.
वाचा –
दररोज ३३ लिटर दूध देते –
सरस्वतीने एका दिवसात 33.131 लिटर दूध देण्याचा विक्रम केला आहे. त्याचवेळी आणखी एका पाकिस्तानी म्हशीने 33.800 लिटर दूध देण्याचा नवा विक्रम केला आहे. यानंतर या नव्या विक्रमाकडे शेतकरी पवित्र सिंह यांची नजर आहे. हा विक्रम सरस्वती लवकरच मोडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या (Farmers) डेअरीत मुर्राह जातीची म्हैसही आहे. म्हशींचे पालन केवळ पैशासाठी नाही तर छंदासाठी करत असल्याचे सांगितले आहे. या म्हशीला प्राण्यांप्रमाणे फक्त चारा आणि धान्य दिले जाते. नेहमीचा खुराक असूनही ही सरस्वती म्हैस इतर प्राण्यांपेक्षा खास आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –