नक्की वाचा: शेतकरी कंपन्यांनी केली कमाल! आर्थिक सुबत्ता झाली बेमिसाल, ग्राहकांची सुद्धा होईल धमाल…पहा काय आहे अनोखा ‘हा’ उपक्रम…
Farmer companies did the maximum! Unprecedented financial well-being, consumers will also be in a frenzy
हळूहळू शेती आधुनिकतेकडे वाटचाल करत चाललेली आहे. नवीन तंत्र व वेळेनुसार सुधारित कार्यपद्धती यांचा अवलंब शेतकरी करताना दिसत आहेत. त्यातलीच एक अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे सातारा फार्मर मार्ट. ‘सातारा फार्मर मार्ट’ मध्ये 35 फार्मर कंपनीने उत्पादित केलेल्या शेतमालाची विक्री सुरू असते त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला शेतीला दर मिळू लागला आहे.
सातारा शहरापासून थोडे अंतरावर असलेले लिंब येथील अशोक करंजे, संदीप शिंदे, रवींद्र कांबळे प्रभाकर गायकवाड, भास्कर सावंत, बाळकृष्ण शिंदे अमोल जाधव, राजेंद्र सावंत, शिल्पा करंजे यांनी एकत्र येऊन ऍग्रो प्रोडूसर शेतकरी कंपनीची स्थापना केली.
फक्त कंपनी स्थापन करून उपयोग नाही तर त्याच्यासाठी मार्केटिंग ची व्यवस्था करणे ही गरजेचे होते. शेतीमाल कुठे विकायचा? कसा व किती रुपयाला विकायचा? अधिक चांगल्या दराने कसा विकता येईल? असे अनेक प्रश्न होते.
या सार्या प्रश्नांना उत्तर त्यांनी स्वतः शोधले आणि लिंब परिसरात त्यांनी व्यवसाय प्रारंभ केला व्यवसाय पुढे जाण्यासाठी माहिती व मार्गदर्शनाची आवश्यकता होती त्यासाठी त्यांनी बारामतीतील केव्हीके येथे भेट देऊन काही प्रशिक्षणे घेतली. कंपनीकडे त्याकरता प्रथम तेल घाणा ही सुरू केला . त्यासाठी त्यांनी स्वतः सोयाबीन चे उत्पादन घेतले. विकेल ते पिकेल या कृषी विभाग योजनेच्या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी कंपन्या, महिला बचत गट, शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था निर्माण केली.
या शेती मार्ट मध्ये स्वतःच्या कंपनीकडून तयार होणाऱ्या शेतीमाल तसेच इतर शेतकरी कंपन्यांचे उत्पादित होणाऱ्या शेतीमाल विक्रीसाठी ठेवण्यात आला. महाराष्ट्र कृषी उद्योग व बारामती केवीके यांच्या कडून खते औषधाचे डीलरशिप सुद्धा घेण्यात आल्या.
शेतकरी कंपन्यांकडून निर्मित होणारे शेतीमाल विक्रीची अडचण येते. योग्य भावही मिळत नाही. शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते याच्यातून शेतीमॉल संकल्पना पुढे आली. अशाप्रकारे आधुनिकतेची कास धरल्यास ध्येय निश्चित ठेवल्यास एकमेकांना साह्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे शेतीमध्ये एकमेकांचा हात धरून आपण पुढे जाऊ शकतो. अशा शेतीमधील नवनवीन संकल्पना पुढे आल्या तर निश्चितच शेतीचा विकास होईल.