कृषी बातम्या

Fake seeds in Maharashtra |महाराष्ट्रात बनावट बियाणे आणि मनमानी विक्रीला आळा घालण्यासाठी कृषीमंत्री मुंडे यांच्याकडून ‘कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ क्रमांक जारी!

मुंबई, १० जून २०२४: राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट तसेच विक्रेत्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर कृषी विभाग सतर्क झाला आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ क्रमांक जारी केला आहे.

या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे शेतकरी बियाणे आणि खते यांच्या विक्रीतील गैरव्यवहार आणि मनमानी बाबत तक्रार करू शकतात. शेतकऱ्यांना तक्रार करताना दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा आणि इतर पुरावे व्हॉट्सॲप क्रमांक ९८२२४४६६५५ वर पाठवता येतील.

वाचा :Scheme |शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये मिळवा 35% पर्यंत अनुदान!

कृषी विभाग या तक्रारींची त्वरित दखल घेऊन तपासणी करून आवश्यक कारवाई करेल. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यामागील कारणे:

  • राज्यात बोगस बियाणे आणि खते विक्री होत आहेत.
  • शेतकऱ्यांकडून मनमानी आकारले जात आहेत.
  • काही कंपन्या शेतकऱ्यांना विशिष्ट कंपन्यांचे बियाणे आणि खते खरेदी करण्यास भाग पाडत आहेत.

हेल्पलाइन क्रमांक सुरू झाल्यामुळे होणारे फायदे:

  • शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते विक्रीपासून वाचवणे.
  • मनमानी आकारणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई.
  • शेतकऱ्यांना योग्य बियाणे आणि खते निवडण्यास मदत.
  • कृषी क्षेत्रात पारदर्शकता आणणे.

कृषी विभागाने आवाहन:

कृषी विभागाने शेतकऱ्यांना ‘कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ क्रमांकाचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे शेतकरी बियाणे आणि खते यांच्या विक्रीतील गैरव्यवहार आणि अन्याय यांच्याविरोधात आवाज उठवू शकतात.

या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, त्यांना योग्य बियाणे आणि खते मिळवण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button