कोवीड - १९

बाजारामध्ये आले आहे बनावट रेमडेसिवीर ! खरे इंजेक्शन कसे ओळखाल?

Fake RemadeSavir has hit the market! How to identify true injection?

कोरोनाचा (Corona) प्रचंड वाढता वेग हा जीवघेणा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे, यामध्येच रुग्णांसाठी वापरण्यात येणारे “रेमडेसिवीर” (Remedesivir) या इंजेक्शनचा राज्यामध्ये काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन कसे ओळखणे हे आपण पाहू

हे ही वाचा: सोयाबीन लागवड करण्यापूर्वी घ्या अशी काळजी

बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या भामट्यांचीही कमी नाही तसेच काळाबाजार (Black market) करणाऱ्यांची या राज्यात काही कमी नाही त्यामुळे योग्य आणि खऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची ओळख असणे गरजेचे आहे. तसेच त्याबाबत जनजागृती (Awareness) करणे ही गरजेचे आहे.

हे ही वाचा अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न!

*रेमडेसिवीर “या”पद्धतीने ओळखा इंजेक्शन
१) 100 मिली. ची बॉटल असते. बॉक्स आणि बॉटलवर तसे स्पष्ट नमूद असते. ही बॉटल उघडल्यानंतर एकदाच वापरात आणली जाते.

२)सर्व इंजेक्शन 2021 मध्ये बनले आहेत.त्यामुळे इंजेक्शन बघताना त्यावरचे साल 2021 आहे काही पहा.

३) काचेची बॉटल खुपच नाजूक असते.

हे ही वाचा: संकटावर मात करत या गावाने रचला अंजीरात “नंबर वन ” होण्याचा मान!

४)इंजेक्शन फक्त पावडर स्थितीच मिळते,त्यामुळे तुम्हाला बनावट इंजेक्शन ओळखण्यास मदत मिळेल.

५)बॉक्सच्या मागे बार कोड तयार केलेला असतो हा बारकोड स्कॅन करा. तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

हे ही वाचा पिकांच्या जीवनक्रमामध्ये ‘ह्या’ घटकांचे महत्व; त्या घटकांची कमतरता, लक्षणे व त्यावर करा, अशा उपाययोजना…

६) इंजेक्शनच्या सर्व बॉटलवर RxRemdesivir
लिहलेले असते.

७)खोट्या रेमडेसिवीरच्या बॉक्सवर पत्त्त्याचे स्पेलिंग चुकवलेले असते.

देशामध्ये बऱ्याच ठिकाणी हे बनावट इंजेक्शन विकल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात देखील इंजेक्शन विकणार्‍यांना अटक करण्यात आली आहे, काही ठिकाणी तर रेमडेसिवीर नावाखाली पाणी भरून इंजेक्शन विकणारे भामटे देखील आहेत, यापासून सतर्क राहणे आवश्यक आहे.

देशात तसेच राज्यातील अशा घटना अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा घटना माणुसकीला काळिमा फासत आहेत त्यामुळे रेमडेसिवीर या इंजेक्शनची माहिती सर्वान पर्यंत पोहोचवावी व जनजागृती करावी.

हे ही वाचा: भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआय कडून सावधगिरीचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button