Krishi Udan Scheme | काय सांगता! शेतकऱ्यांचा माल थेट विमानाने पोहोचणार सातासमुद्रापार, जाणून घ्या योजनेसह कागदपत्रांची पूर्तता
सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असतं. सरकार सतत वेगवेगळ्या योजना राबवत शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता प्रयत्न करतं.
Krishi Udan Scheme | शेतकऱ्यांनी पिकवलेले शेतीतील (Agriculture) पीक (Crop) याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर यावे यासाठी देखील वेगवेगळ्या उपाययोजना राबवतं. इतकच नाही, तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी देखील धडपड करत. त्याचबरोबर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे जास्त शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन निघत आहे. मात्र, याउलट शेतकऱ्याचा पिकाला योग्य ती बाजारपेठ मिळत नाही. आता सरकारने एक हटके योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे. ज्याद्वारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ शकतील.
काय आहे सरकारची ‘ही’ योजना?
आपल्या भारत देशांमधील जवळपास 60 टक्के नागरिकांचा शेतकरी शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या 60 टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह हा केवळ शेती व्यवसायावरच चालतो. याच कारणामुळे शेतकऱ्याच्या पिकांना योग्य तो भाव मिळणे गरजेचे आहे. यासाठीच सरकारने पुढाकार घेत 2021 मध्ये ‘कृषी उड्डाण योजना’ चालू केली होती. ऑक्टोंबर 2021 मध्ये 2.0 मध्ये श्रेणी सुधार करण्यात आली. यामुळे नाशवंत शेतीमालाची लवकर वाहतूक शक्य झाल्याने योजनेचा जास्त फायदा होऊ लागला.
शेतमालाची थेट होणार विमानानेच वाहतूक
2021 साली सुरू झालेल्या ‘कृषी उड्डाण योजने’कडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष देखील घातले आहे. त्याचवेळी सरकारकडून शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी विमानांमध्ये आरक्षित जागा ठेवून त्यांना अनुदान देखील दिले जात आहे. त्याचबरोबर विमान वाहतूककीमधून मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस या व्यवसायासंबंधित वस्तूंची वाहतूक करणे सोपे होईल.
शेतकऱ्यांना होणार मोठ्या प्रमाणात फायदा
या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतीतील तसाच पडून न राहता लवकरात लवकर तो विक्रीस बाहेर पडेल. त्यामुळे शेतीतील मालाचे नुकसान होणार नाही. म्हणून शेतकऱ्यालाही आर्थिक फटका बसणार नाही.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता
- प्रधानमंत्री कृषी उडान योजनेचा लाभ झालेल्या अर्जदाराला भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
- अर्जासाठी आधार कार्ड अनिवार्य
- शेतीशी संबंधित काअर्जदाराने
- निवास प्रमाणपत्र
- दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो
- रेशन कार्ड अनिवार्य
- माहितीसाठी मोबाइल नंबर आवश्यक
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: