ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Fact Check : सुकलेला भाजीपाला दोन मिनिटात फ्रेश? वाचा यामागचे सत्य…

Fact Check: Fresh dried vegetables in two minutes? Read the truth behind this

सोशल मीडियावर (On social media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Video goes viral)होत असतात, सध्या सोशल मीडियावर तुटलेला भाजीपाला (Vegetables) दोन मिनिटात फ्रेश कसा होतो हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे त्या मागील सत्य पडताळणार आहोत..

या व्हिडिओमध्ये एक भांड्यात पाण्यासारखे फेसळ द्रावण आहे, त्यामध्ये सुकलेला भाजीपाला बुडवला असता भाजीपाला दोन मिनिटांनी भाजीपाला फ्रेश ताजा टवटवीत दिसू लागतो. सोबत असे सूचित केले आहे की भाजीपाला शेतकऱ्यांकडून घ्या असेही नमूद केले आहे. व्यापारी आपल्या डोळ्यात धुळ फेकत आहेत.

अनेक ठिकाणी ताजा भाजीपाला दिसल्यास भाजी घेतली जाते, व्यापारीवर्ग आपल्या डोळ्यात धूळ फेकून आरोग्याशी खेळत आहेत हे आपणास समजत नाही. मात्र आपण अशा गोष्टी पासून सावधान राहने आवश्यक आहे.

हे ही वाचा :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भातशेतीसाठी तयार केले ‘हे’ आधुनिक यंत्र! वाचा : यंत्राचे वैशिष्ट्य…

रासायनिक भाजीपाला व फळे खाल्ल्यास आरोग्यास धोका निर्माण होतो.

जाधवपूर येथील विद्यापीठाने संशोधनातून हे काळं सत्य समोर आलं आहे. अन्न तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक उत्पल रायचौधरी शेतीमधील भाजीपाला असेच कच्ची फळे यावर रासायनिक प्रक्रिया करून पिकवली जातात किंवा भाज्या ताज्या दिसावेत यासाठी रासायनिक पदार्थ मिसळतात परंतु हे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे फळातील व भाजीपालामधील पौष्टिकता कमी होते.

भाजीपाला व फळे (Vegetables and fruits) यामध्ये मिसाळणारे रसायाने:
भाजीपाला व फळे कॉपर सल्फेट, र्होडॅमिन ऑक्साईड, मालाकाइट ग्रीन आणि प्राणघातक कार्बाईड ही रसायने सामान्यत: वापरली जातात. त्यामुळे मानवी शरीरावर तसेच मेंदूवर परिणाम होतात त्यामुळेच स्मृतिभ्रंश (Amnesia) देखील होवू शकतो. अशा रसायनांमुळे मानवाला कॅन्सर (Cancer) सारख्या आजारांना सामोरे जावे लागेल.

हे ही वाचा :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भातशेतीसाठी तयार केले ‘हे’ आधुनिक यंत्र! वाचा : यंत्राचे वैशिष्ट्य…

फॅक्ट चेक (Fact check)
या व्हिडिओ मागचा फॅक्ट चेक केला असता, वृत्तवाहिनीच्यामते हा व्हिडिओ सत्य असून त्यामागे कोणते एडिटिंग केली नाही, किंवा काटछाट केलेली नाही.

भाजीपाला घेताना अशी घ्या काळजी…(Take this time while taking vegetables)

भाजीपाला घेत असताना प्रत्येक भाजीला विशिष्ट गंध नसतो तो गंध तपासून पहा, अनेक रसायनामध्ये बुडवलेले भाजीपाल्याला गंध येत नाही किंवा त्याला रसायनाचा गंध येतो.

अनेकदा फळांना चकाकी येण्यासाठी पावडर किंवा रासायनिक गोष्टींचा वापर केला जातो त्या करता फळे हाताने चोळून पहा हाताला चिकट किंवा पावडरी सारखे लागल्यास अशी फळे घेऊ नका.

हे ही वाचा

बाजारातून जनावरे खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?

या’ पिकांच्या उत्पादकतेवर होणार हवामान बदलाचा अनिष्ट परिणाम! जाणून घ्या या संकटाशी कसा कराल सामना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button