कृषी सल्ला

धमाका, टाटाची सर्वात स्वस्त एसयूव्ही tata punch झाली लॉन्च; किंमत आणि फीचर्स पहा सविस्तर…

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित माइक्रो एसयूव्ही टाटा पंच अखेर भारताच्या बाजारात लाँच झाली आहे. कंपनीने भारतीय बाजारात टाटा पंच एसयूव्हीच्या बेसिक व्हेरिअंटसाठी एक्स-शोरूम किंमत ५.४९ लाख रुपये निश्चित केली आहे.

वाचा

तर, टॉप व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत ८.४९ लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती प्रास्ताविक आहेत, म्हणजेच कंपनी नंतर कारची किंमत वाढवू शकते. टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 18.97 kmpl मायलेज देईल आणि AMT ट्रान्समिशन व्हेरिअंटमध्ये 18.82 kmpl मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. हा मायलेज ARAI प्रमाणित आहे.

टॉप मॉडेल टाटा पंच क्रिएटिव्ह ट्रिम लेव्हल AMT ची किंमत ९.०९ लाख रुपये –

टाटा पंचला भारतात ५.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे., जो त्याच्या शुद्ध ट्रिम लेव्हल व्हेरिएंटची किंमत आहे. तर, Adventure ट्रिम लेवलची किंमत ६.३९ लाख रुपये, Accomplished ट्रिम लेवलची किंमत ७.२९ लाख आणि Creative ट्रिम लेव्हलची किंमत ८.४९ लाख रुपये आहे. या किंमती मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायाच्या आहेत. तर, Adventure, Accomplished आणि Creative व्हेरिअंटची AMT पर्यायाची किंमत मॅन्युअल प्रकारांपेक्षा ६०,००० रुपये अधिक आहे. म्हणजेच, टॉप मॉडेल टाटा पंच क्रिएटिव्ह ट्रिम लेव्हल AMT ची किंमत ९.०९ लाख रुपये असेल.

वाचा –

टाटा पंच कंपनीच्या ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ALFA प्लॅटफॉर्मवर कंपनीने अल्ट्रोज देखील बनवली होती, त्यामुळे या कारमध्ये आणि अल्ट्रोजमध्ये बरंच साम्य दिसून येतं. यात १.२-लीटर, ३-सिलेंडर, रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन असून, हे इंजिन ६,००० आरपीएम वर ८५ बीएचपी पॉवर आणि ३,३०० आरपीएमवर ११३ एनएम टॉर्क निर्माण करते. यात ५-स्पीड मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

7 आकर्षक रंगामध्ये खरेदी करू शकणार –

यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्टसह 7 इंचाची हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 7-इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आयआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ऑटो हेडलॅम्प, अल्ट्रोझ सारखी 90-डिग्री उघडण्याचे दरवाजे, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल आणि 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील्ससह अनेक खास फीचर्स आहेत. सुरक्षेच्या बाबतीतही पंच जबरदस्त आहे. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टनुसार, पंच भारतात तयार केलेले सर्वात सुरक्षित वाहन आहे ज्याची सुरक्षा एजन्सीने चाचणी केली असून ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ही कार ७ आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये (Orcus White, Atomic Orange, Daytona Grey, Meteor Brown, Calypso Red, Tropical Mist आणि Tornado Blue) खरेदी करता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button