युरियाचा अति वापर करताय? तर सावध राहा, उत्पादनात घट होऊन पिकांचे होऊ शकते नुकसान..
शेतकरी शेतामध्ये युरिया खत चा वापर अधिक प्रमाणात करतात. युरिया खत हे इतर खतांपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे शेतकरी युरियाच्या वापराला अधिक पसंती देतात. जर युरिया खतांचा विचार केला तर नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरिया चा वापर सर्वाधिक केला जातो. तर यातून नुकसान पिकाला किंवा उत्पादनाला नुकसान कसे होऊ शकते? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
हे आहेत युरियाच्या अति वापराचे परिणाम
युरिया हा पाण्यात पूर्णपणे विरघळणारा असतो. युरियाचे रासायनिक संरचना पाहिली तर युरिया मध्ये 20.6 टक्के ऑक्सिजन, 20 टक्के कार्बन, सात टक्के हायड्रोजन आणि एक ते दीड टक्के बाय युरेट असते. युरियाच्या अतिवापराने पिकांमध्ये लुसलुशीत पणा राहून खोड नाजुक राहते. युरिया चा जास्त वापर केल्याने त्याचा परिणाम हा जमिनीच्या आरोग्यावर होतो. जमिनीतील कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते.
वाचा –
युरियाचा अति वापर केल्याने जमिनी मध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रो बेक्टर सारख्या जीवाणूंच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. तसेच जमिनीत असलेल्या गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. त्याचा सरळ परिणाम हा पीक वाढीवर होतो. महत्त्वाचे म्हणजे युरिया खताच्या जास्त वापरामुळे जमिनीतील पाण्याच्या प्रतीवर देखील परिणाम होतो. पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते. पाण्यातील शेवाळ आणि पान वनस्पतींची वाढ होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा