हवामान

Weather App | हवामान बदलण्यापूर्वीच ‘या’ मोबाईल ऍपवरून मिळणार माहिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा…

Weather App | हवामानाच्या अनिश्चिततेमुळे भारतातील शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. खरीप हंगाम 2022 (Kharif Season 2022) मध्येही पावसाच्या खराब प्रवृत्तीमुळे अनेक शेतकरी शेतात (Agriculture) वेळेवर पिकांची लागवड करू शकले नाहीत, तर काही शेतकऱ्यांची पिके पेरणीनंतर दुष्काळामुळे उद्ध्वस्त झाली. या परिस्थितीतून शेतकऱ्यांची आर्थिक (Financial) जाचातून सुटका करण्यासाठी आणि खराब हवामानापूर्वी शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी मोबाइलच्या ऍपद्वारे माहिती मिळणार आहे.

वाचा: कापूस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! मुहूर्तालाच कापसाला मिळणार ‘इतका’ भाव

कोणते आहे हे मोबाईल ऍप?
शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि हवामान आधारित सल्ल्याबद्दल सतर्क केले जाईल. जेणेकरून शेतकरी शेतीशी (Agricultural Information) संबंधित कार्ये वेळेपूर्वी हाताळू शकतील आणि त्यांच्या पिकांना सुरक्षितता प्रदान करू शकतील. Weather & Radar India App असे या ऍपचे नाव आहे. ज्याला आतापर्यंत 4.2 रेटिंग मिळाले आहेत.

शेतकऱ्यांना काय होणार फायदा?
या ऍपद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक तासाला हवामान बदलाविषयी माहिती मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत कोणत्या वेळी काय काम करायचे याचे नियोजन करत येणार आहे. हे ऍप आतापर्यंत जवळपास 5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे ऍप तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे. यावर तुम्हाला हवामान थेट रडार नकाशे, मान्सून पावसाचा अंदाज, फार्म वेदर, 7 ते 14 दिवसांचा लोकल वेदर फोरकास्ट यांसारखी माहिती मिळेल.

वाचा: शेतकऱ्यांनो ‘या’ भागात कोसळणार विजांसह पाऊस, पिकाची काळजी घेण्यासाठी वाचा महत्वपूर्ण कृषी सल्ला

कसे कराल डाऊनलोड?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे ऍप तुमच्या मोबाईमध्ये डाऊनलोड करायचे असेल तर आम्ही तुम्हा सोपी प्रक्रिया सांगतो. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन Weather & Radar India App या ऍपचे नाव सर्च करू शकता. त्याचबरोबर तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=de.wetteronline.wetterappया लिंक वर क्लिक करून देखील तुमच्या मोबाईलमध्ये हे ऍप सहजच डाऊनलोड करू शकता. जे तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Information will be available from this mobile app even before the weather changes, farmers will benefit greatly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button