
आदित्य गुळमे हे मूळचे करकंबचे रहिवासी. यांनी सरकारी नोकरी सोडून. शेतीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल याचा विचार केला . त्यांच्या कल्पनेतून शेतकऱ्यांना फायदा कसा मिळवून दिला जाईल यासाठी प्रयत्न करत राहिले. आगळीवेगळी शेती करायची असेल तर गावी करकंब मध्ये येऊन काम करण्याचं ठरवलं.
करकंब मध्ये पॉली हाऊस त्यांनी सुरू केलं. ज्यामध्ये चार लाख रोपांची क्षमता आहे.
वाचा : स्वस्त कर्जात व्यवसाय उभा करायचा आहे? तर तुम्हाला या योजनेबद्दल माहीत असलेच पाहिजे..
ऊस, टोमॅटो, ढोबळी मिरची, पत्ता कोबी आदींची रोपे त्यांनी विकसित केली. या रोपांच्या वाढीसाठी त्यांनी नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला. पण रोपे देणाऱ्या शेतकऱ्याला केवळ सल्ला न देता त्याचे अपेक्षित उत्पादन हाती येईपर्यंत सर्व प्रकारची मदत मिळेपर्यंत प्रयत्न करायचे ठरवले.
त्यांनी जानेवारीत हे काम सुरू केले होते. त्यांना टोमॅटोच्या पिकाबद्दल प्रयोग केले. पीक येण्याचा कालावधी आठ दिवसांनी कमी झाला व उत्पादन चक्क 50 टन एकरी काढता आले. 14 प्रकारच्या नॅनोपार्टिकलची ट्रीटमेंट केलेली होती व आता उसाच्या बाबतीत किमान 100 टन एकरी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.
वाचा : अबब! हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानचा वापर करून मिळावा दुग्ध जनावरांसाठी 10 दिवसात चारा…
या संशोधनात गॅस क्रोमॅटोग्राफी, हायपरप्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफीचा उपयोग केला. आता शेतकऱ्यांनी त्यांना माती परीक्षण, द्राक्षाचे पान-देठ तपासणी, पाणी परीक्षण सेवांची मागणी देखील केली आहे.
कमी खर्चात कमी रासायनिक खतांचा वापर करून योग्य तंत्राने अगदी अचूक शेती करता येते. तंत्राचा वापर अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी केला.अद्ययावत शेती तंत्र थेट गावापर्यंत आणू शकतो. शेतीत आपण प्रत्यक्षात आणू शकतो. हे करकंबच्या आदीत्य गुळमे यांनी दाखवून दिले.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :