ताज्या बातम्या

Elgar Yatra | सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी रविकांत तुपकरांचा एल्गार! 20 दिवसांची रथयात्रा काढणार, काय आहेत मागण्या?

Elgar Yatra | Ravikant Tupkar's Elgar for soybean and cotton farmers! 20 days of Rath Yatra, what are the demands?

Elgar Yatra | नागपूर, 25 ऑक्टोबर 2023 – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 20 दिवसांची एल्गार यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Elgar Yatra) ही यात्रा 1 नोव्हेंबरपासून शेगाव येथून सुरू होईल आणि 20 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात समाप्त होईल.

या यात्रेच्या माध्यमातून तुपकर हे राज्य आणि केंद्र सरकारवर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लक्ष देण्याचा दबाव टाकणार आहेत. या मागण्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस दरवाढ, यलो मोझ्याक, बोंडअळी नुकसान भरपाई, पिकविमा यासह अन्य न्याय मागण्यांचा समावेश आहे.

तुपकर यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत या यात्रेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, इतका निच्यांकी बाजारभाव शेतमालाला दिला जात आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

वाचा : पीक नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीचा पातुर्ड्यात शपथ एल्गार. मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनकरू! प्रशांत डिक्कर

25 ते 31 ऑक्टोबर पर्यंत रविकांत तुपकर ठिकठिकाणी घेणार बैठका

या यात्रेपूर्वी 25 ते 31 ऑक्टोबर पर्यंत रविकांत तुपकर हे सोयाबीन आणि कापूस पट्ट्यात ठिक-ठिकाणी सोयाबीन -कापूस परिषदा आणि शेतकऱ्यांच्या बैठका घेवून जनजागृती करणार आहेत.

20 नोव्हेंबर रोजी एल्गार रथ यात्रेचा समारोप हा एल्गार महामोर्चात होणार असून बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार (व्यापारी संकुल) येथून एल्गार महामोर्चाला सुरुवात होणार आहे.

तुपकर म्हणाले की, आपल्या हक्कासाठी आपल्याला तीव्र असा लढा द्यायचा आहे. सरकारला शेतकरी आणि तरुणांची ताकद दाखवून द्यायची वेळ आली आहे.

या यात्रेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Web Title : Elgar Yatra | Ravikant Tupkar’s Elgar for soybean and cotton farmers! 20 days of Rath Yatra, what are the demands?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button